(स्थानिक गुन्हे शाखा सातारा व पाटण पोलीस स्टेशन यांची संयुक्त कारवाई) पवनचक्कीमधील तांब्याच्या तार असलेल्या केवल वायरची चोरी करणारी टोळी जेरबंद करुन त्यांचेकडुन चोरीचे दोन गुन्हे उघड करुन एकुण 1,13,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.
सातारा जिल्हा प्रतिनिधी शशिकांत माथने
दिनांक 16/10/2025 ते दिनांक 15/01/2026 रोजीचे दरम्यान सडावाघापुर व वनकुसवडे ता. पाटण जि.सातारा परिसरातील सुझलॉन कंपनीच्या पवनचक्क्यांमधील तांब्याच्या तारा असलेल्या केबल वायरची चोरी झाले बाबत पाटण पोलीस ठाणे तक्रार प्राप्त झाल्याने त्याप्रमाणे पाटण पोलीस ठाणे येथे 1) गुरनं. 3/2025 भा.न्या.सं.क. 303(2) सह भारतीय विद्युत अधिनियम कलम 136 प्रमाणे 2) गुरनं. 18/2026 भा.न्या.सं.क. 303(2) सह भारतीय विद्युत अधिनियम कलम 136 असे गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. नमुद गुन्हयाचे अनुशंगाने तसेच यापुर्वी देखील पवनचक्कीमधील केबल वायर चोरी झालेली असल्याने श्री. निखील पिंगळे पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी नमुद गुन्ह्यासह पवनचक्कीमधील केबल वायर चोरीचे गुन्हे करणारे आरोपींची माहिती काढून सदरचे गुन्हे उघडकीस आणणे बाबतच्या सुचना विश्वजीत घोडके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे विश्वजीत घोडके, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांनी पोलीस उपनिरक्षक श्री. परीतोष दातीर यांचे अधिपत्याखाली विशेष पथक तयार करुन अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती काढून सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना दिलेल्या आहेत.
दिनांक 30/04/2026 रोजी विश्वजीत घोडके, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना त्यांचे गोपनिय बातमीदारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, पवनचक्कीमध्ये चोरीस गेलेली केबल वायर ही प्रकाश निकम, नवनाथ कदम, पंकज कदम रा. जांभेकरवाडी ता. पाटण जि. सातारा यांनी केली आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी सदरची माहिती पोलीस उपनिरीक्षक परीतोष दातीर यांना नमुद इसमाना ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचारपूस करुन पुढील कारवाई करणेबाबत मार्गदर्शन करुन सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक परीतोष दातीर यांचे पथकाने जांभेकरवाडी परिसरातून नमुद इसमांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचारपूस केली असता त्यांनी सडावाघापुर व वनकुसवडे ता.पाटण या परिसरातील सुझलॉन कंपनीच्या पवनचक्क्यांमधील तांब्याच्या तारा असलेल्या केबल वायर चोरी केल्याचे कबुली दिल्याने त्यांचेकडुन 1) गुरनं. 03/2025 भा.न्या.सं.क. 303(2) सह भारतीय विद्युत अधिनियम कलम 136 प्रमाणे 2) गुरनं. 18/2026 भा.न्या.सं.क. 303(2) सह भारतीय विद्युत अधिनियम कलम 136 असे एकुण 02 गुन्हे उघड करुन त्यांचेकडुन गुन्हयामध्ये चोरीस गेलेला एकुण 1,13,000/- रुपये किंमतीच्या 260 किलो केबल वायर मधील तांब्याची तार हस्तगत करणेत आलेली आहे. नमुद तीनही आरोपीना दिनांक 30/04/2026 रोजी अटक करणेत आली असुन सदरचे आरोपी हे सध्या पोलीस कस्टडीमध्ये असुन त्यांचेकडे अधिक तपास चालु आहे.
सदर कारवाई मध्ये श्री. निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, पाटण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कवठेकर, सपोनि रमेश गर्जे, रोहित फाणें, पोउनि परीतोष दातीर, विश्वास शिंगाडे, पाटण पोलीस स्टेशनचे पोउनि चव्हाण, पोउनि सदगर, स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार सफौ. अतीष घाडगे, राजु मुलाणी, पोहवा विजय कांबळे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, शरद बेबले, लेलैश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अमित झेंडे, अजय जाधव, सुजित भोसले, अमित सपकाळ, अरुण पाटील, अमित माने, शिवाजी भिसे, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, गणेश कापरे, ओंकार यादव, स्वप्नील शिंदे, मोहन पवार, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, रविराज वर्णेकर, संकेत निकम, चालक सफौ. शिवाजी गुरव व पाटण पोलीस स्टेशनचे अंमलदार सफौ आव्हाड, पोकॉ. कदम, गुरव, मोरे यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे. सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक, सातारा व अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे.
आरोपीचे नाव
- 1. प्रकाश निवृत्ती निकम वय 34 वर्षे रा. जांभेकरवाडी, पाटण ता.पाटण जि. सातारा.
2. नवनाथ गुलाब कदम वय 23 वर्षे रा. जांभेकरवाडी, पाटण ता. पाटण जि.सातारा.
3. पंकज आनंदा कदम वय 25 वर्षे रा. जांभेकरवाडी, पाटण ता. पाटण जि. सातारा.

