रावेर तालुक्यातील एका गावात ४८ वर्षांच्या नराधमाकडुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार !* सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल* " *नराधामांच्या विरुद्ध तीव्र प्रतिक्रिया*

**रावेर तालुक्यातील एका गावात ४८ वर्षांच्या नराधमाकडुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार !*पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल* 

" *नराधामांच्या विरुद्ध तीव्र प्रतिक्रिया* 

जळगाव जिल्हा क्राईम रिपोर्टर 


 रावेर तालुक्यातील एका गावात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली असून यात एका नराधम मावसाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, रावेर तालुक्यातील एका गावात एक भयंकर घटना घडली आहे. यात सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर नात्याने तिचा काका (मावसा) लागणाऱ्या ४७ वर्षांच्या प्रौढाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार १२/११/२०२५ ते २९/५/२०२६ या कालावधीत घडला.या मुलीवर त्या व्यक्तीने दबाव टाकून बळजबरीने शारीरीक संबंध बनविले.अखेर पीडित मुलीने आज या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
यानुसार सावदा पोलीस स्थानकात त्या नराधमाच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४ (२)(एफ); ३५१ (२) आणि पोक्सो कायद्यातील कलम ४,६,५, (एन)अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पुढील तपास एपीआय विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक राहूल सानप, हवालदार मेहरबान तडवी आणि कॉन्स्टेबल संजय तडवी हे करत आहेत.या भयंकर प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून या नराधमाच्या विरूध्द सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.
Previous Post Next Post