बालभारती आणि एन.सी.इ.आर.टी. ची पुस्तके बंधनकारक करा ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे तहसीलदार मार्फत शालेय शिक्षण मंत्र्याना पत्र

बालभारती आणि एन.सी.इ.आर.टी. ची पुस्तके बंधनकारक करा 

ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे तहसीलदार मार्फत शालेय शिक्षण मंत्र्याना पत्र 

महेश निमसटकर 
ज़िल्हा विभागीय संपादक भद्रावती चंद्रपुर 


भद्रावती, दि. २९ : प्राथमिक आणि माध्यमिक शाळांत बालभारती आणि एन.सी.इ.आर.टी. प्रकाशनाचीच ची पुस्तके बंधनकारक करा. अशा मागणीचे पत्र ग्राहक पंचायत महाराष्ट्र, भद्रावतीने दि.२९ मे ला तहसीलदार, राजेश भांडारकर मार्फत शालेय शिक्षण मंत्र्याना पाठविण्यात आले.
     सध्या खाजगी शाळांत शालेय साहित्याची विक्री मोठ्या प्रमाणात सूरु आहे. मुख्यत्वे विद्यार्थी ज्या शाळेत शिकत आहे त्याच शाळेतून पुस्तके विकत घेणे बंधनकारक आहे. विशेष म्हणजे ही पुस्तके विशिष्ट प्रकाशनाची असून ती बाहेर बाजारात उपलब्ध नाही. त्यामुळे पालकांना नाईलाजाने मोठी किंमत मोजून पुस्तके शाळेतूनच घ्यावी लागते.
     असे लक्षात आले की, पुस्तकांची छापील किंमत (𝙼𝚁𝙿) ही अवाजवी असल्यामुळे यातून खाजगी शाळा भरगच्च कमाई करत आहे. शिक्षणासोबतच पुस्तके विक्रीचा मोठा गोरखधंदा खाजगी शाळेने उभारला आहे. महागड्या पुस्तकांमुळे पालकांना खुप मोठा आर्थिक भार सहन करावा लागत आहे. 
     यावर ठोस उपाययोजना करने आता गरजेचे झाले आहे. त्यामुळे सर्व वर्गासाठी स्टेट बोर्ड मान्यता असणाऱ्या सर्व खाजगी शाळांना बालभारती प्रकाशनाची पुस्तके आणि सी.बी.एस.सी. मान्यता प्राप्त शाळांना एन.सी.इ.आर.टी. प्रकाशनाची पुस्तके आणि अभ्यासक्रम बंधनकारक करावा. ज्यामुळे स्टेट बोर्ड आणि सी.बी.एस.सी. अभ्यासक्रमात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांची पुस्तके सहज बाजारात मिळू शकेल. असे झाल्यास शाळेतील पुस्तकांची दुकाने बंद होऊन स्वस्त दरात पालकांना पुस्तके मिळतील आणि पालकांवरचा आर्थिक भार कमी होण्यासाठी मदत होईल.
     पालकांची अडचण लक्षात घेता ग्राहक पंचायत महाराष्ट्र, भद्रावती ने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये या विषयाकडे अधिक लक्ष देऊन तात्काळ कारवाई करण्याची विनंती पत्राद्वारे केली आहे.
     यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे अध्यक्ष प्रवीण चिमुरकर, भारत खोब्रागडे, विनोद ठमके, सोनल वावरे, गुरुदेव बावणे, नामदेव रामटेके आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Previous Post Next Post