स्वच्छतेचा संदेश देत पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती संपन्नकर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समिती चा उपक्रम

स्वच्छतेचा संदेश देत पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती संपन्न

कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समिती चा उपक्रम 

महेश निमसटकर 
ज़िल्हा विभागीय संपादक भद्रावती चंद्रपुर 


भद्रावती,दि३१:-दानशूर ,लोककल्याणकारी, लोकमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा तत्कालीन काळातील  जाज्वल व इतिहास , हिंदू धर्म व संस्कृती जोपासणूक, शेती विकास, व्यापार वृदिंगत धोरण ,युद्धभूमीवरील नेतृत्व आदी आजही प्रेरणादायी आहेत.
३१ मे  रोजी जयंतीचे औचित्य साधून भद्रावती नगर परिषद अंतर्गत गणपती वॉर्ड गवराळा येथील कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समिती च्या वतीने विशेष आयोजन करीत ग्राम सफाई अभियानातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली.
धनगर समाज बांधव व जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळ सदस्यांनी विशेष सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी करण्यात सहकार्य केले.
Previous Post Next Post