पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील पथकाची वेळा शिवारात दारुबंदी कायद्यान्वये कारवाई
विदर्भ मराठवाडा संपादक अब्दुलकदीर जेष्ठ पत्रकार वर्धा जिल्हा
दि 24.05.2026 रोजी पो.स्टे. हिंगणघाट पथकातील पोलीस स्टाफ, प्रविण बोधाने, स्वप्नील जिवने, सागर सामृतवार , प्रमोद डडमल यांना मुखबीर कडुन खाञीशीर खबर मिळाली की मौजा वेळा शिवारात लीलाधर बोरकर राहणार वेळा हा वेळा शिवारातील झाडा झुडपामध्ये दोन प्लास्टिक ड्रम ठेवून त्यामध्ये गावठी मोहा दारू काढण्याकरिता कच्चा मोहा सडवा रसायन तयार करीत आहे अशा माहितीवरून दोन पंचा समक्ष वेळा शिवारात जाऊन पाहणी केली असता लीलाधर रामजी बोरकर राहणार मोजा वेळा तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा हा दोन प्लास्टिक ड्रम मध्ये मोहा दारू काढण्याकरिता कच्चा मोह रसायन सोडवा तयार करताना मिळून आल्याने जागीच घटनास्थळ पंचनामा कारवाई करून नमूद आरोपी लीलाधर बोरकर याचे ताब्यातून एकुण जु किं 15000/रू चा मुद्दे माल जप्त करण्यात आला असून आरोपी विरूध्द दारूबंदी कायद्यान्वये पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल सा.मा.अप्पर पोलीस अधिक्षक श्री सदाशिव वाघमारे सा.मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुशिलकुमार नायक सा यांचे मार्गदर्शनात मा.पोलीस निरीक्षक अनिल राउत सा.याचे निर्देशाप्रमाणे, प्रविण बोधाने, स्वप्नील जिवने, सागर सामृतवार , प्रमोद डडमल यांनी केली .

