*महेशकुमार निमसटकर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित*
महेश निमसटकर
भद्रावती चंद्रपूर जिल्हा विभागीय संपादक
भद्रावती,दि.8 (तालुका प्रतिनिधी)
येथील लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षक - पालक संघाचे सदस्य महेशकुमार निमसरकर यांना राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
सदर पुरस्कार महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या वतीने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो. शिर्डी येथे एका शानदार सोहळ्यात निमसरकर यांना हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते सन्मानाने प्रदान करण्यात आला. यावेळी सुप्रसिद्ध कवी रोहीत शिंगे, कवयित्री गुंजन पाटील, सिनेअभिनेत्री भार्गवी चिरमुले, महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे अध्यक्ष दीपक चामे, पालीवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
निमसरकर यांना शिक्षण क्षेत्रात कार्य करण्याची विशेष आवड असून ते शिष्यवृत्ती, एन.एम.एम.एस., नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा याबाबत एक सेवा म्हणून विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करतात. आपली वेकोलीतील नोकरी सांभाळून ते हे सेवा कार्य करतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शिक्षक पॅनलने त्यांना सन्मानित केले.त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

