*धार्मिक वातावरणात रंगणार;**श्री गणेशदत्त गुरुंपंचायत मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा होणार*

*धार्मिक वातावरणात रंगणार;*
*श्री गणेशदत्त गुरुंपंचायत मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा होणार*
 
महेश निमसटकर 
भद्रावती चंद्रपूर जिल्हा विभागीय संपादक 



भद्रावती : श्री गणेशदत्त गुरुंपंचायत मंदिर, दत्तवाडी, सानेगुरुजी सोसायटी, भद्रावती येथे सोमवार दिनांक १५ जून २०२६ रोजी वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
      या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता दैनंदिन आरती व पूजापाठाने होणार आहे. त्यानंतर सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत श्री विष्णु लक्ष्मीजी याग पार पडणार आहे. दुपारी १ ते ३ या वेळेत गीत रजनी (भजन) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत गुरु चरित्रातील १४ व्या अध्यायाचे पठण करण्यात येणार आहे.
      सायंकाळी ६.१५ वाजता श्री गणेश आरती व पूजन होईल. त्यानंतर सायंकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत विशेष उपासना आयोजित करण्यात आली आहे. तसेच सायंकाळी ७.३० ते रात्री १० वाजेपर्यंत महाप्रसाद व भजन संगीताचा कार्यक्रम होणार आहे.
      या धार्मिक सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून प.पू. श्री विष्णुदास स्वामी महाराज, आध्यात्मिक साधना केंद्र, भद्रावती उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास सर्व उपासकांनी सहपरिवार उपस्थित राहून दर्शन व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Previous Post Next Post