नव्याने रुजू झालेल्या ठाणेदारांचा दणका; सावंगी (मेघे) पोलिसांची ४.६८ लाखांच्या मुद्देमालासह मोठी कारवाई

नव्याने रुजू झालेल्या ठाणेदारांचा दणका; सावंगी (मेघे) पोलिसांची ४.६८ लाखांच्या मुद्देमालासह मोठी कारवाई

प्रतिनिधी, मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक 

 दिनांक.६ /६/२०२६ सावंगी (मेघे) पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक विनोद गिरी यांच्या नेतृत्वाखाली अवैध गावठी दारू व्यवसायाविरोधात मोठी धडक कारवाई करण्यात आली. शिरखेडा परिसरात टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी तब्बल ४ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई वर्धा जिला पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे तथा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक विनोद गिरी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांविरोधात कठोर भूमिका घेत ही प्रभावी कारवाई केली.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शिरखेडा येथील राजवीरसिंग रघुवीरसिंग बेदी व मोनिका राजवीरसिंग बेदी यांच्या राहत्या घराशेजारील शेत परिसरात छापा टाकण्यात आला. यावेळी गावठी मोह दारू निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात मोहसडा रसायन साठवून ठेवल्याचे आढळून आले.

कारवाईदरम्यान पोलिसांनी २० मोठ्या ड्रममध्ये साठवलेले सुमारे २ हजार लिटर मोहसडा रसायन, २ ड्रममध्ये साठवलेले २०० लिटर उकळते मोहसडा रसायन, २२ लोखंडी व प्लास्टिक ड्रम, २० लिटर गावठी मोह दारू तसेच दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण ४ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक विनोद गिरी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक गोपाल शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सतीश दुगाणे तसेच सावंगी (मेघे) पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

नव्या ठाणेदारांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या धडक कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सावंगी पोलिसांची मोहीम यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
Previous Post Next Post