शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
(मो मकसुद बावा वर्धा जिल्हा विभागीय उपसंपादक)
हिंगणघाट : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. याप्रसंगी पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख तथा माजी राज्यमंत्री मा. श्री. अशोकभाऊ शिंदे, जिल्हाप्रमुख श्री. राजेंद्र खूपसरे, उपजिल्हाप्रमुख श्री. सतीश धोबे,तालुकाप्रमुख श्री. मनीष देवडे तसेच शहर प्रमुख श्री सचिन पोटदुखे यांच्या सह सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला वंदनीय हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर
कार्यक्रमात उपस्थित शिवसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यानी सांगितले कि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला समोर घेऊन जाऊ, त्यांच्या विचाराशी एकनिष्ठ राहून आपण आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आपण प्रत्येकानी पूर्ण निष्ठेने व समर्पित भावनेने कार्य करू.मागच्या काही दिवसात ज्या खासदारांनी गद्दारी केली त्यांचा सुध्दा निषेध केले.महाराष्ट्रातील जनता त्यांना धडा शिकवेल आणि यावर जास्त विचार न करता आता पुन्हा पेटून उठले पाहिजे आणि पक्ष प्रमुख मा. उध्दव साहेबांच्या अडचणीच्या काळात आपली साथ देणे हा आता काळजी गरज आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त मिष्ठान्न वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, महिला आघाडी ,युवा सेनेचे पदाधिकारी शंकर मोहमारे ,गुणवंतराव वानखेडे ,अविनाश धोटे, गजानन काटवले ,हिरामण आवारी, नितीन वैद्य ,भास्कर ठवरे, पप्पू घवघवे, नरेंद्र गुळकरी, चंद्रशेखर भोयर, अतिक मिर्झा ,विलास चौधरी, गणेश वडुले, राहुल मोहितकर, मारुती अराडे, महेश धुरतकर ,रौनक चंदीतारा ,दिनेश धोबे, नितीन घोरखेडे,अनंता सोरटे,प्रशांत सुपारे, संजय मोरे,अनिल सोरटे ,नईम शेख ,प्रमोद खडतकर ,प्रकाश इंगळे,मिलिंद खंगण असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक

