पोलीस स्टेशन सेलूच्या पथकाने अवैध दारू व्यवसायाविरोधात मोठी कारवाई करत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून गावठी दारू व कच्चा मोहसडा जप्त करून नष्ट केला. या कारवाईत एकूण २ लाख ८३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
(मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपनीय माहितीच्या आधारे ठाणेदार पंकज वाघोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. पहिल्या कारवाईत शिवाजीनगर परिसरात ७२० लिटर कच्चा मोहसडा, गावठी दारू व साहित्य असा एकूण १ लाख ५७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा साठा नष्ट करून संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर जयपूर शेतशिवारातील बोरे नदीच्या काठावर छापा टाकण्यात आला. येथे २०० लिटर कच्चा मोहसडा, ४०० लिटर कच्चा मोहसडा सडवा व इतर साहित्य असा १ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी तोही नष्ट करून पुढील कारवाई केली.
या दोन्ही कारवायांमुळे अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, परिसरातील दारू तस्करीवर मोठा आघात झाल्याचे मानले जात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मुकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार पंकज वाघोडे यांच्या नेतृत्वात पोलिस पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. नागरिकांनी या कारवाईचे स्वागत करत पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे.

