उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सचिन वैद्य यांचा सत्कार*
*(विदर्भ मराठवाडा संपादक अब्दुलकदीर जेष्ठ पत्रकार वर्धा जिल्हा)
*निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघाचे द्वितीय वर्धापन दिन उत्साहात साजरा*
*प्रतिनिधी*
यवतमाळ जिल्ह्यातील माहूर मध्ये निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे दुसरे वर्धापन दिन जगदंबा सभागृह माहूर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये द्वितीय वर्धापन दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान व पुरस्कार सोहळा पार पाडण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गणेश कचकलवार होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून किरण कुमार भोंडवे उपविभागीय पोलीस अधिकारी माहूर यांची उपस्थिती होती तर विशेष उपस्थिती म्हणून दभप साईनाथ महाराज वसमतकर आनंद दत्तधाम मठाधिपती तथा महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता दूत तथा औद्योगिक प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र राज्य प्रमुख मार्गदर्शक ह्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तर माहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, माहूर नगरीचे नगरसेवक गोपू महामुने, सामाजिक कार्यकर्ता मनोज कीर्तने,ज्येष्ठ पत्रकार जयकुमार अडकिने, भाग्यवान भवरे, निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघाचे द्वितीय वर्धापन दिन
नांदेड जिल्हाध्यक्ष संभाजी सूर्यवंशी, मनीषाताई टाकसाळ अमरावती, यांची मंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन करून महापुरुषांना वंदन करण्यात आले. यामध्ये वर्धा जिल्ह्यातील एकमेव म्हणून उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सचिन वैद्य यांचा सत्कार करण्यात आला तसेच अनेकांना उत्कृष्ट पत्रकार, सामाजिक क्षेत्र, क्रीडा, शिक्षण, रास्त भाव दुकानदार संघाचे अध्यक्ष, कायदेविषयक, स्वच्छता, संगणक क्षेत्र अशा विविध पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन त्यांचा शाल श्रीफळ व सत्कार करण्यात आला. तसेच
पुढील वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा दिल्या.

