वाहतुकीचे नियम पाळा आपला जीव आणि इतरांचा जीव वाचवा
पोलीस निरीक्षक विलास पाटील वाहतूक नियंत्रण शाखा यांचे आव्हान
वाहतूक सुरक्षेची गरज अत्यंत महत्त्वाची बनली आहे जर आपण वाहतुकीच्या नियमाचे पालन केले नाही आपल्यासाठी नव्हेतर इतरांसाठी ही एक धोका निर्माण होऊ शकते
विदर्भ मराठवाडा संपादक अब्दुलकदीर जेष्ठ पत्रकार वर्धा जिल्हा विभागीय)
आज दि 26/06/26 रोजी सकाळी 11/00 ते 12/00 वाजेच्या दरम्यान मा पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल सर यांच्या मार्गदर्शन नुसार वाहतूक नियंत्रण शाखा वर्धा यांच्या कडून सेंट ऍंथोनी स्कुल मध्ये विध्यार्थी यांना वाहतूक नियम जनजागृती बाबत व मादक अमली पदार्थ, चे सेवण करू नये याबाबत कार्यशाळा घेण्यात आली सदर कार्यशाळामध्ये पोलीस निरीक्षक विलास पाटील, सहाय्य्क फोजदार रियाज खान यांनी विध्यार्थी, पालक शाळा प्रशासन यांना मार्गदर्शन केले त्यात वाहतूक नियमांचे पालन करावे, हेल्मेट चा वापर करावे अपघात टाळlवे शाळा परिसरात जवळपास कोठेही तंबाखू सिगरेट खर्रा विक्री होत असेल तर पोलिसांना माहिती द्यावी **ड्रग्ज फ्री वर्धा** कोणतेही व्यसन अमली पदार्थ सेवण करू नयेत, काही अमली पदार्थ खरेदी विक्री बाबत काहीही माहिती असल्यास याबाबत पोलिसांना त्वरित माहिती द्यावी
स्कुल बसेस मध्ये ही चालक व क्लीन्नर यांनी ही विद्यार्थी सुरक्षे कडे विशेष लक्ष दयावे आपले स्कुल बस ही कमी वेगl मध्ये चालवावे, रोडचे बाजूला योग्य ठिकाणी वाहन उभे करावे, विद्यार्थी नेण्यासाठी त्यांचे पालक आल्याशिवाय लहान मुलांना रोडवर सोडून जाऊ नयेत विद्यार्थी समोर स्कुल बस मध्ये कोणीही तंबाखू गुटखा खर्रा खाऊ नये लहान मुलावर त्याचा वाईट प्रभाव पडत असतो चालकाचे क्लीन्नर यांचे ही मेडिकल. स्कुल व्यान चीही फिटनेस तपासानी ही पोलीस सतत करीत राहील स्कुल व्यान मध्ये पोलीस मदत करिता निशुल्क फोन न 112. अंबुलेन्स मदत नंबर 108. महिला बालक मदत टोल फ्री नंबर 1098 हे फोन नंबर स्कुल व्यान मध्ये दर्शनी भागावर लिहावे चालक क्लीन्नर यांना ड्रेसकोड , ओळखपत्र नियमितपणे दयावे
आपले शहर हे *अपघातमुक्त शहर व अमली पदार्थ मुक्त शहर**करणेस सर्वनी सहकार्य पोलिसांना करावे असे आवाहन वाहतूक पोलिसांनी आज सेंट ऐनथोनी स्कुल मधील जनजागृती कार्यक्रम मध्ये केलेले आहे,
पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा वर्धा

