अल्पवयीन मुलगी पळवली ! संशयिताला पोलिसा कडून बेड्या,मुलीची सुटका

अल्पवयीन मुलगी पळवली ! 
संशयिताला पोलिसा कडून बेड्या,मुलीची सुटका

(खुलताबाद तालुका /प्रतिनिधी. )

दि.२९ जुलै 
खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी परिसरातील गावांतील एकाने एक अल्पवयीन मुलगी फुस लावून पळवली होती.आखेर दिड महिन्यानंतर संशयित आरोपीला ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या व मुलीची सुटका करण्यात आली आहे.

बाजार सावंगी परिसरातील एका गावातील करण संजय गायकवाड नामक युवकाने दि.१२ जुन दरम्यान अल्पवयीन मुलगी फुस लावून पळवली होती या प्रकरणी तक्रार झाल्या नंतर खुलताबाद पोलिस त्याच्या मागावर होती. गत दिड महिन्यांपासून फरार संशयित वजा डुबा परिसरात वास्तव्यात असल्याची खबर पोलिसांना लागल्यावर पोलिसांनी वजा डुबा परिसरात धाव घेत संशयीत आरोपी व अल्पवयीन मुलगी यास ताब्यात घेऊन संशयिताला बेड्या ठोकल्या तर अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे.पुढील तपास प्रक्रिया पोलिस करत आहे.
Previous Post Next Post