दहिगावात मयत व्यक्तीच्या नावावर दीड लाखाचे कर्ज मंजूर.

दहिगावात मयत व्यक्तीच्या नावावर दीड लाखाचे कर्ज मंजूर.

(महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल)

यावल दि.२९  जुलै 
दहिगाव ग्रामपंचायत लिपिकाकडून उताऱ्यावर फेरफार करून मयताच्या नावावर दीड लाखाचे कर्ज मंजूर केल्याने,फसवणुक झाल्याने यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल. 
याबाबत माहिती अशी की
दहिगाव ग्रामपंचायत कार्यालयातील लिपिक रवींद्र शिवाजी पाटील याने दोघ भावाच्या नावे असलेल्या घराच्या उताऱ्यावर  मोठ्या भावाचे नाव कमी करून लहान भावाच्या नावावर उतारा देऊन महेंद्र फायनान्स कंपनीचे दीड लाख रुपयाचे कर्ज लहान भावाच्या नावे काढण्यास अनुमती दिली आहे, त्यावरून फायनान्स कंपनीने सुद्धा दीड लाख रुपये कर्ज लहान भावाला दिले आहे. हा प्रकार उघडकीस आल्याने याबाबत पंचायत समितीकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.हेमराज प्रभाकर पाटील आणि दिगंबर प्रभाकर पाटील या दोघा भावांचे नावे ग्रामपंचायत घर नंबर १०१२ / १ या उताऱ्यावर हेमराज पाटील यांचे नाव कमी करून २०१७ मध्ये दिगंबर पाटील याचे मालकी नावाचा उतारा देण्यात आला हा उतारा तत्कालीन ग्रामसेवक मच्छिंद्र गंगाराम पाटील व लिपिक रवींद्र शिवाजी पाटील या दोघांनी दिलेला आहे.त्यावेळेस रवींद्र हा लिपिक नसून शिपाई होता तरी देखील त्याने उताऱ्यावर लिपिकाच्या उताऱ्यावर  सही करून उतारा संबंधित व्यक्तीला दिलेला आहे. त्यावरून महेंद्र फायनान्स कंपनीने त्यास दीड लाख रुपयांचे कर्ज दिलेले आहे. अशाप्रकारे त्याने हेमराज पाटील यांची फसवणूक करून त्यांना न जुमानता लोभाच्या आमिषाला जाऊन उतारा दिलेला आहे, स्वतःचा आर्थिक लाभ करून घेत स्वतःचा फायदा करून विश्वासघात केलेला आहे,तसेच सध्याचे ग्रामपंचायत अधिकारी  प्रतापरावजी बोदळे यांचेकडे महिंद्रा फायनान्स कंपनीने  उतारा मागितला असता तेव्हा देखील दिगंबर प्रभाकर पाटील या नावे दि. ८ जुलै २०२६ रोजी उतारा दिलेला आहे, मात्र २३ जुलै रोजी पुन्हा उतारा काढला असता त्या उताऱ्यावर हेमराज प्रभाकर पाटील आणि दिगंबर प्रभाकर पाटील या दोघा भावांची नावे दिसून आलेली आहेत. अवघ्या पंधरा दिवसातच दोन वेगवेगळे उतारे कसे दिले जातात हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे.रवींद्र पाटील याने शासनाची व माझी फसवणूक केलेली आहे त्याचे वर योग्य कार्यवाही करावी अशी मागणी हेमराज पाटील यांनी केलेली आहे लिपिक नसताना शिपाई पदावर असून देखील त्याने लिपिक हुद्द्यावर सही का केली. हा प्रश्न निर्माण झालेला आहे. तरी संबंधित या व्यक्तींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी हेमराज पाटील यांनी केलेली आहे. ग्रामपंचायत कार्यालयात असे अनेक प्रकरण उघडकीस येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून फेरफार केलेल्या उताऱ्यांची तपासणी / चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
Previous Post Next Post