*बिलोली तालुक्यात शिक्षणाचा खेळ खंडोबा, शाळा इंग्रजी शिक्षण मराठी !* (राहुल दुगावकर,उपसंपादक, नांदेड)इंग्रजी शिक्षणाच्या नावाखाली संस्था चालकांकडून पालकांची आर्थिक लूट चालवली जात असून विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षण देण्याऐवजी अप्रशिक्षित शिक्षकांकडून मराठी माध्यमातूनच शिक्षण देण्याचा अफलातून प्रकार बिलोली तालुक्यात सुरू असून याकडे शिक्षण विभाग लक्ष देत नसल्याचा संताप नागरिकात व्यक्त होत आहे. इंग्रजी भाषेला आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून प्रतिष्ठा आहे. भविष्यात आपल्या मुलांना अस्खलित इंग्रजी लिहिला, वाचता व बोलता याचे तसेच इंग्रजी भाषेचा उपयोग जब शिक्षणात व नोकरीत, व्यवहारात होईल या आशेपोटी इंग्रजी शाळेचा अट्टाहास पालक धरत आहेत. मात्र इंग्रजी शाळां त्या कसोटीवर उतरताना दिसून येत नाहीत. इंग्रजी शाळेच्या माध्यमातून शिक्षणाचा खेळखंडोबा चालवला जात आहे. तालुक्यात इंग्रजी शाळांना शासनाची अधिकृत मान्यता असून प्रत्यक्षात किती अधिकृत व अनधिकृत शाळा कार्यरत आहेत याची पूर्ण माहिती पंचायत समिती तर्फे मिळाली नाही.*कालबाह्य वाहनांमुळे विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात* - विद्यार्थ्यांना ने-आन करण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक शाळेने स्वतः ची खाजगी वाहने ठेवली आहेत त्यातील बहुतांश बाहने ही जीर्ण व कालबाह्य स्वरुपाची झाली असल्यामुळे विद्यार्थ्याच्या जीवाला धोका निर्माण झाला असून पोलिस व परिवहन विभागाचे याकडे लक्ष नाही. दरम्यान शाळा सुरु होण्यापूर्वी टॅक्स, इग्यव्हिंग लायसन्स शिक्षणं विभाग व परिवहन विभागाकडे सादर करणे अनिवार्य असते मात्र ही पद्धत कोणत्याही शाळेकडून अवलंबलेली नाहीं, विद्यार्थ्यांना गुरागत कोंबून ने-आण केली जात आहे.

Previous Post Next Post