जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हिप्परगा थडी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा. (मारोती एडकेवार तालुका:प्रतिनिधी सगरोळी ) सगरोळी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिप्पारगा थडी येथे 31 जून 2025 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साही, प्रेरणादायी, व शिस्तबद्द पद्धतीने मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांसोबत शिक्षक वर्गाचाही विशेष सहभाग होता,शाळेतील शिक्षक तसेच योग प्रशिक्षक पर्यावरण प्रेमी,मा बालाजी ल. गेंदेवाड सर,यांनी योगाचे महत्त्व सांगून उपस्थित विद्यार्थ्यांना योगाचे, शस्त्र शुद्ध मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात मंत्रोच्चार, व प्रार्थनेने,झाली. सर्व विद्यार्थी,व शिक्षक मैदानावर योग्य मंचावर,एकत्र येत ताडासन, वज्रासन ,त्रिकोणासन,भुजंगासन, पवन मुक्तासन, शीर्षासन, इत्यादी आसनाचा सराव केला.तसेच प्राणायाम,अनुलोम,विलोम, कपालभाती, भ्रमरी, श्वसनक्रिया, व ध्यान याचाही अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला, व पर्यावरण शिक्षक प्रेमी गेंदेवाड सर यांनी विद्यार्थ्यांना, समजेल अशा भाषेत योगाचे फायदे,सांगितले योग,हा जीवनशैलीचा भाग आहे तो केवळ शारीरिक तंदुरुस्तीसाठी, नसून मानसिक शांती,आत्मिक विकास, आणि एकाग्रस्त साठी सुद्धा, उपयुक्त आहे.प्रत्येक विद्यार्थ्याने दररोज काही वेळ योगासाठी द्यावा, असा अमूल्य संदेश गेंदेवाड सरांनी दिला.उपस्थित विद्यार्थ्यांचे पालक, शाळेचे मुख्याध्यापक मुत्येपोड सर, मुख्याध्यापकांनी, गेंदेवाड सर यांच्या कार्याचा कौतुक केले, योग दिनानिमित्त गेंदेवाड सरांनी जिल्हा परिषद शाळा हिप्परगा थडी येथे सकाळी 6:30 वाजता.20 किलोमीटरचा प्रवास करून उपस्थित राहून, विद्यार्थ्यांना योग आसन व योग दिनानिमित्त मोठ्या उत्साहात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना योगा विषयी माहिती देण्यासाठी,विद्यार्थ्यांचं आणि पर्यावरण प्रेमी शिक्षक गेंदेवाड सरांचं जिल्हा परिषद शाळा व गावातील सर्व पालक व शिक्षण प्रेमी,कडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हिप्परगा थडी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.                                 
Previous Post Next Post