पिंपरुड येथील मातोश्री फाउंडेशन तर्फे गेली दहा वर्षे दरवर्षी विविध कार्यक्रम उत्साहात .. फैजपूर प्रतिनिधी शैक्षणिक ,सामाजिक, आरोग्य , नेत्र तपासणी, मोतीबिंदू शिबिर आदि अनेक उपक्रम राबवण्यात येतात .यावर्षी सुद्धा पंचक्रोशीतील माध्यमिक ,उच्च माध्यमिक विद्यालयातील फेब्रुवारी व मार्च २०२५ दरम्यान घेण्यात आलेल्या १०वी व १२ वी परीक्षेत शाळेनिहाय प्रथम क्रमांक आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार रविवार दि २२ रोजी फैजपूर येथे स्वामी समर्थ मंगल कार्यालयात सकाळी दहा वाजता घेण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक नेते एस डी भिरूड अध्यक्ष जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढी व एस जे तळले मुख्याध्यापक कुसुमताई चौधरी विद्यालय फैजपूर व दिव्य मराठी वृत्तपत्राचे पत्रकार व ज्येष्ठ शिक्षक श्री संदीप चौधरी यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम,प्रमाणपत्र, मेडल असे पुरस्काराचे वितरण करण्यात आले . प्रास्ताविक पर भाषण मातोश्री फाऊंडेशन चे अध्यक्ष जनार्दन जंगले यांनी केले,मातोश्री फाऊंडेशन ने गेल्या दहा वर्षात केलेल्या समाजकार्याचा आढावा घेतला, येत्या शुक्रवार दि.27 जून रोजी पिंपरुड फाटा येथील गट क्र.439 वर होणाऱ्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचा सर्व गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आणि सर्व मान्यवरांकडून असेच सहकार्य भविष्य काळात मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली , त्यानंतर प्रमुख पाहुणे शिक्षक नेते श्री एस डी भिरूड सरांनी विद्यार्थ्यांनी आता मिळालेल्या यशामुळे हुरळून न जाता भविष्यात येणाऱ्या आव्हानांना स्वीकारावे असे सांगून शुभेच्छा दिल्या.कुसुमताई चौधरी विद्यालय फैजपुर चे मुख्याध्यापक सुनील तळले , भारत विद्यालय न्हावी चे मुख्याध्यापक यांनी व इतर मुख्याध्यापक, शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी परिसरातील मुख्याध्यापक सर्वश्री भारत विद्यालय न्हावी व्हि. बी वारके, आ गं.हायस्कूल सावदा भालेराव सर,, जे टी महाजन इंग्लिश माध्यम शाळा, मोसेस जाधव, जे टी महाजन सेमींइग्लिश शाळा श्री नंदकिशोर सोनवणे, मौलाना अबुल कलाम आझाद शाळेचे शेख सर, प्रगती विद्यालय रोझोदा सुरवाडे सर, अंतूर्ली शाळा श्री गुळवे सर, शकुंतला विद्यालय फैजपूर चे गणेश गुरव, शिक्षक , विद्यार्थी, पालक , भोपाळ हून खास आलेले श्री अरुणकुमार इंगळे, चिनावल शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री इंगळे सर व मान्यवर उपस्थित होते. नुकतेच सेवानिवृत्त झालेले कलाविष्कार संस्थेचे श्री युवराज लोधी सरांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला, श्री लोधी सरांनी स्वतः काढलेली ज्येष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची तसबीर मातोश्री फाऊंडेशन ला भेट दिली. कार्यक्रमाचे संचालन श्रीमती वैशाली चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन व्ही ओ चौधरी यांनी केले.सत्कार समारंभाचे यशस्वीतेसाठी मातोश्री फाउंडेशनचे उपाध्यक्ष चंद्रकांत जंगले,बालकृष्ण खडसे, डॉ भूषण जंगले ,शालिनी चौधरी ,मधुबाला जंगले, विजय सराफ,शिरीष टोके, मुख्याध्यापक सलीम तडवी,युवराज लोधी, प्रा यशवंत वारके यांनी प्रयत्न केले.

पिंपरुड येथील मातोश्री फाउंडेशन तर्फे गेली दहा वर्षे दरवर्षी विविध कार्यक्रम उत्साहात ..                                                    
Previous Post Next Post