फैजपूर नगरपालिकेला तीन वर्षानंतर अविनाश गांगोडे मुख्याधिकारी मिळाले . (फैजपुर प्रतिनिधी ) फैजपूर येथील गेल्या तीन वर्षापासून मुख्यअधिकारी यांची बदली झाली तेव्हापासून कोणतेही मुख्याधिकारी पदभार स्वीकारण्यास नकार देत होते शहरात अनेक समस्या माहितीचे अधिकार अर्ज फाटे विकास कामांना फाटा अशा अनेक समस्यांमुळे मुख्य अधिकारी फैजपूर नगरपालिकेला येण्यास नकार देत होते या तीन वर्षाच्या वर च्या कार्यकाळात अनेक मुख्य अधिकारी यांनी अतिरिक्त कारभार सांभाळला परंतु कोणीही मुख्याधिकारी यशस्वी झाले नाही बहुतेक मुख्य अधिकारी यांनी फैजपुर नगरपालिकेला येण्यास नकार दिल्यामुळे शहरात अनेक नागरी समस्या निर्माण झाल्या परंतु जळगाव जिल्हा अधिकारी यांनी संभाव्य होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकी च्या दरम्यान स्वतः गंभीर दखल घेऊन फैजपुर नगरपालिकेला सक्षम मुख्याधिकारी यांची कायमस्वरूपी नेमणूक केली असल्यामुळे सुज्ञ नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केला जात आहे तसेच नवनिर्वाचित मुख्य अधिकारी यांच्यापुढे अनेक नागरी समस्या असून ते यशस्वीपणे राबवतील अशी अपेक्षा फैजपूर शहरातील नागरिक करीत आहे त्यामुळे त्यांचे सर्वत्र स्वागत केले जात असून येथील यावल तालुका शिंदे गटाच्या महिला अध्यक्ष पूजाताई पाटील यांनी त्यांचे स्वागत केले असूनत्यांच्यासोबत महिला कार्यकर्ता उपस्थित होत्या
byMEDIA POLICE TIME
-
0