शेख सलिमाबी चाँदसाब यांनी, कुर्ला डाक कार्यालयात रक्षाबंधनातून दिला एकतेचा संदेश. ( मारोती एडकेवार नांदेड /ज़िल्हा प्रतिनिधी नांदेड : ) नांदेड जिल्ह्यातील रहिवासी,महिला डाक कर्मचारी हिरकणी पुरस्कार प्राप्त, शेख सलीमाबी चाँदसाब यांनी, कुर्ला डाक कार्यालय मुंबई,येथे शनिवारी रोजी,रक्षाबंधनाच्या दिवशी कार्यालयातील कार्यरत कर्मचारी वर्गास,मनगटी राखी बांधून या भावा बहिणीच्या उत्तुंग भाव गर्भ रक्षाबंधनातून एकतेचा संदेश दिला. भावा बहिणीचे निखळ प्रेम,अबाधित असणारा हा राखी पौर्णिमेचा सण,संबंध राज्यभर व भारतभर गणला जातो.प्रत्येक घराघरात या सणाला अन्य साधारण असे महत्त्व राहिले, आहे मुंबई शहरातील डाक विभागात कार्यरत असताना, थोडीशी उसंत घेऊन महिला कर्मचारी हिरकणी पुरस्कार प्राप्त नांदेड जिल्ह्यातील,देगलूर येथील रहिवासी, शेख सलिमाबी चाँदसाब यांनी, रक्षाबंधनानिमित्त तेथील कर्मचारी वर्गास राखी बांधून एकतेचा, एकात्मताचा,संदेश राज्यभर. दिला आहे, या त्यांच्या सर्व पत्रकार व समाजसेवकाकडून कौतुक करण्यात येत आहे, सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

शेख सलिमाबी चाँदसाब यांनी, कुर्ला डाक कार्यालयात रक्षाबंधनातून दिला एकतेचा संदेश.                                       
Previous Post Next Post