फैजपुर डीवायएसपी म्हणून अनिल बडगुजर यांची नियुक्ती. (यावल दि. ८ ( सुरेश पाटील ) जळगाव जिल्ह्यात जळगाव,भुसावळ,फैजपूर आणि पाचोरा या चार उपविभागांना नवे डीवायएसपी लाभले आहेत.त्यात फैजपूर येथे नितीन बडगुजर तर जळगाव येथे गणापुरे यांची तसेच बापू रोहोम यांची पाचोरा येथे नियुक्ती झाल्याचे अधिकृत रित्या समजले.जळगाव उपविभागाचे संदीप गावीत यांच्याकडे भुसावळ जंक्शन उप विभागाचा पदभार दिला आहे.जळगाव उपविभागाचे डिवायएसपी संदीप गावीत यांचा पदभार मालेगाव ग्रामीणचे डिवायएसपी नितीन गणापुरे यांच्याकडे देण्यात आला.याच जागेवर काही दिवसांपुर्वी भडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक पांडुरंग पवार यांची पदोन्नतीवर नियुक्ती होणार असल्याची चर्चा होती. तसेच गेल्या काही महिन्यापासून फैजपूर उपविभागाचा अस्थायी कारभार आता स्थायी होणार असून फैजपूर येथे अनिल बडगुजर यांची नियुक्ती करण्यात आली.आयपीएस अन्नपुर्णा सिंग यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी काही दिवस प्रभारी म्हणून भुसावळ उप विभागाचे डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांनी अतिरिक्त कारभार सांभाळला.त्यानंतर काही दिवस चोपडा उप विभागाचे अण्णासाहेब घोलप यांनी अतिरिक्त कारभार पाहिला.पुर्ण वेळ कार्यभार नसल्याने फैजपूर उप विभागाकडे कमी अधिक प्रमाणात दुर्लक्ष झाल्याची जाणीव दिसून आली.मात्र आता फैजपूर उपविभागाची महत्त्वाची पोलीस दलाची जबाबदारी अनिल बडगुजर यांच्याकडे आली आहे.अनिल बडगुजर आणि बापू रोहोम यांनी यापुर्वी जळगाव जिल्ह्यात कामकाज केले असल्यामुळे त्यांना जळगाव जिल्ह्यातील सामाजिक राजकीय क्षेत्रासह गुन्हेगारी क्षेत्राची चांगल्या प्रकारे माहिती आहे.

फैजपुर डीवायएसपी म्हणून अनिल बडगुजर यांची नियुक्ती.                                                                                  
Previous Post Next Post