डॉक्टराच्या निष्काळजीपणाने मृत्यू? मृतदेह दोन तास रुग्णालयातच. धर्माबाद शासकीय ग्रामीण रुग्णालयातील प्रकाररुग्णालयात वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. तदनंतर दोन तासांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. वेणुगोपाल पंडित यांनी संबंधित डॉक्टर आणि नर्स यांची बदली करण्याचे आश्वासन दिल्याने मृताच्या नातेवाइकांचा रोष शांत झाला. त्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. ही घटना ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी वाजता घडली.धर्माबाद शहरातील गणेशनगर येथील शिवाजी गोपीनाथ पांचाळ कावलगुडेकरवर ६२) यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना ७ऑगस्ट रोजी उपचारासाठी धर्माबाद शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेव्हा येथील डॉक्टर व नर्स १५ ते २० मिनिटे उपचारासाठी कोणीच आले नाही. दरम्यान, रुग्णाच्या छातीतील वेदना अधिक तीव्र झाल्या. त्यांना त्रास होऊ लागल्याने नातेवाइकांनी शहरातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला.शिवाजी पांचाळ यांना परत शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तेव्हा नातेवाइकांचा संताप अनावर झाला. येथील डॉक्टर वेळेवर तेव्हाच आले असते तर मृत्यू झाला नसता, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे पांचाळ यांचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाइकांनी केला. तसेच 'दोषी डॉक्टर व नर्सवर निलंबनाची कारवाई करावी, तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही,' अशी भूमिका नातेवाइकांनी घेतली.चौकशीअंती कारवाई करण्याचे आश्वासनवैद्यकीय अधीक्षक डॉ. वेणुगोपाल पंडित यांच्याकडे लावून धरली. दोन-अडीच तास मृतदेह रुग्णालयातच ठेवण्यात आला होता. अखेर ही घटना आणि मृताच्या नातेवाइकांचा संताप पाहून वैद्यकीय अधीक्षक डॉ. वेणुगोपाल पंडित यांनी या घटनेची चौकशी करून वरिष्ठांना अहवाल पाठवू तसेच संबंधितांची बदली करू, असे आश्वासन दिले. त्दनंतर नातेवाइकांनी सायंकाळी ७:१५ वाजता मृतदेह ताब्यात घेतला. मृत शिवाजी पांचाळ यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सून असा परिवार आहे.तालूका प्रतीनीधी सज्जन संतोष
byMEDIA POLICE TIME
-
0