धर्माबाद तालुक्यात महसूल सप्ताह निमित्ताने अनेक उपक्रम सुरू. धर्माबाद तालुक्यात महसूल विभागामार्फत १ ऑगस्ट ते ७ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्यात येत असून प्रशासनाच्या निर्णयानुसार हा सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा केला जात आहे. जनतेने महसूल सप्ताहात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.महसूल विभागाच्या योजना, कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी केले आहे.महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताहास शुभारंभ तसेच महसूल संवर्गातील कार्यरत तसेच सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारीसंवाद, उत्कृष्ट अधिकारी आणि कर्मचारी पुरस्कार वितरणव मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण करण्यात येणार आहे. शासकीय जागेवर सन २०११ च्या पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबांपैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना सदर अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करण्याबाबत कार्यक्रम रबविण्यात येणार आहे. पाणंद व शिवारस्थळांची मोजणी करून त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान प्रत्येक मंडळानिहाय राबविण्यात येणार आहे. विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांकडूनडीबीटी करून अनुदानाचे वाटप केले जाणार आहे. शासकीय जमिनींवरील अतिक्रमण निष्कासित करणे व त्या अतिक्रमणमुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत शासनानुसार नियमानुकूल करणे किंवा सरकारजमा करणे निर्णय घेण्यात येणार आहेत. ७ ऑगस्ट रोजी धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे धोरण पूर्वाभ्यास घेणे आणि महसूल सप्ताहाचा समारोप करण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमांत महसूल अधिकारी आणि कर्मचारी गावागावात जाऊन नागरिकांशी संवाद साधात आहेत. कोणतेही मध्यवर्ती अडथळे न ठेवता योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी सांगितले.तालूका प्रतीनीधी सज्जन संतोष
byMEDIA POLICE TIME
-
0