अक्राणीत मनसे ला अखेर यश.... (सुरतान पावरा तालुका प्रतिनिधी अक्राणी )धडगाव शहरातील रस्ता हा खासदार, आमदार नगर अध्यक्ष नगरसेवक त्याच खड्ड्यावरुन प्रचारही केला परंतु खड्डे बुजवावे अशी कोणत्याही पुढाऱ्यांची मनस्थितीत नव्हती रस्त्याचे प्रश्न असतील आरोग्य संदर्भातील रुग्णालयातील प्रश्न असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील सर्व सामान्य जनतेचे प्रश्न असतील नाही खासदार, आमदार, नगरसेवक हे सर्व कोणतेच प्रश्न सोडवताना दिसत नाही मग या लोकांचं काम तरी काय तुम्हाला आमचे प्रश्न सोडविण्यासाठी निवडूण देत आहे तुम्ही काय करत आहेत असा प्रश्न उपस्थित होते आहे. धडगांव शहरातील संपुर्ण मार्गावरील खड्डेमय रस्ता डांबर टाकून तात्काळ दुरुस्ती करण्याची एका निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडून देण्यात आला होता.मुख्याधिकारी नगर पंचायत धडगांव यांना दि.०९/०६/२०२४ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडून निवेदन देण्यात आले होते सदर विषयी गांभीर्याने दखल न घेतल्यानेमुळे फक्त एका ठिकाणी रस्ता हा तात्पुरता माती टाकून बुजवला गेला परत २ दिवसांत आहे तीच परिस्थिती झाली होती रस्ता खड्डेमयच नादुरुस्त असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ता रोको आंदोलनात तयारीत असताना शेवटी रविवारी व रात्री अखेर रस्ता खडी व मुरुम टाकून बुजविण्यात आले मनसे टीम रस्त्यावर आंदोलना साठी उतरली असता सा.बा. विभागाचे अभियंता व कर्मचारी यांच्या उपस्थितीत लेखी पत्रव्यवहार झाला सदर रस्त्यावरील खड्डे हे पाऊल थांबल्यास कायम चे डांबर टाकून बुजविण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी आंदोलन स्थळी उपस्थित संतोष फेंदा पावरा, अक्राणी अध्यक्ष हेमंत पावरा, उपाध्यक्ष रावसाहेब सुदाम पावरा, सचिव सागर पावरा, पावरा रावसाहेब संजय पावरा, शहर अध्यक्ष प्रकाश पावरा,शहर सचिव किरण पावरा, भाईदास पावरा, विकास पावरा, रावसाहेब प्रताप पावरा, गोपाल पावरा,व अनेक तालुक्यातील युवक उपस्थित होते.

Previous Post Next Post