राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांचे यावल पदाधिकारी कामराज घारू यांचा प्रामाणिकपणा साडेनऊ हजार रुपये रोख व साडेतीन लाख रुपये चा धनादेश केला परत. ( यावल प्रतिनिधी )यावल येथे दुय्यम निबंधक कार्यालय या ठिकाणी आलेले केदारनाथ छगन धांडे राहणार सातोद तालुका यावल या युवकाजवळ असलेले साडेतीन लाखाचा धनादेश व साडेनऊ हजार रुपये रोख असलेली पिशवी हरवली व ती पिशवी सदरील यावल शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी कामराज घारू यांना सापडली त्यांनी धनादेश वरती असलेले नाव केदारनाथ छगन धांडे राहणार सातोद याचा स्वतः शोध घेऊन पोलीस स्टेशनमध्ये मुख्य पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे उप पोलीस निरीक्षक एमजे शेख संदीप सूर्यवंशी किशोर परदेशी अमित तडवी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील पिशवी केदारनाथ छगन धांडे ज्यांना प्रामाणिकपणे परत केली त्यामुळे यावर शहरात व तालुक्यात कामराज घारू यांचं कौतुक होत आहे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांचे यावल पदाधिकारी कामराज घारू यांचा प्रामाणिकपणा साडेनऊ  हजार रुपये रोख व साडेतीन लाख रुपये चा धनादेश केला परत.                                                                
Previous Post Next Post