**मानवत बसस्थानकाचे वाहतूक निरीक्षक माणिकराव तेलभरे यांचा सेवापूर्ती निमित्त सत्कार.*. (मानवत / वार्ताहर.)*——————————*पाथरी राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापक व कर्मचरी यांच्या वतीने माणिकराव तेलभरे यांना निरोप देण्यात आला. मानवत राज्य परिवहन महामंडळाच्या मानवत बस स्थानकाचे वाहतूक निरीक्षक माणिकराव भाऊ तेलभरे हे ( 32 ) वर्षे सेवा देऊन दिनांक 31 जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. राज्य परिवहन महामंडळाचे पाथरी आगाराच्या वतीने त्यांच्या व सहपत्नीक सत्कार करून निरोप देण्यात आला. माजी. आगार प्रमुख श्री चपटे, वाहतूक निरीक्षक गजानन एडले सहायक वाहतूक निरीक्षक धोंडीराम जाधव व पाथरी आगारातील सहकारी व कर्मचारी वाहक, चालक यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सपत्निक सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला.तसेच यावेळी माणिकराव तेलभरे यांचा महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे माजी परभणी जिल्हा अध्यक्ष व रेल्वे प्रवासी प्रकोष्ट परभणी जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने जिल्हा सहसंयोजक के. डी. वर्मा व महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे पाथरी तालुका अध्यक्ष नितीन पाटील यांच्या हस्ते यावेळी माणिकराव तेलभरे यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून निरोप देण्यात आला.याप्रसंगी पाथरी आगाराचे आगार प्रमूख व्यवस्थापक श्री चपटे तसेच वाहतूक निरीक्षक गजानन येडले सहायक वाहतूक निरीक्षक धोंडीराम जाधव यांनी माणिकराव तेलभरे यांनी बत्तीस वर्षे सेवा दिल्याबद्दल व उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल गौरवद्गार काढण्यात आले. यावेळी पाथरी आगारातील कर्मचारी वाहतूक चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
byMEDIA POLICE TIME
-
0