हरनाळी येथील प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर, हनुमंत शिंदे यांचा आमरण उपोषण मागे. (मारोती एडकेवारनांदेड ज़िल्हा/प्रतिनिधी नांदेड): नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील मौजे हरनाळी/ ममदापूर गट ग्रामपंचायत मध्ये,हनुमंत शिंदे यांनी,दलित वस्ती येथे पिण्याच्या पाण्यासाठी 25 रोजी आमरण उपोषणास बसले होते.त्यांना नांदेड जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना व भीम आर्मी व पत्रकार व गावातील नागरिक यांचा मोठा पाठिंबा मिळाला आज दि.28 जुलै रोजी लोकस्वराज आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष,प्रा.रामचंद्र भरांडे सर, व लोकस्वराज आंदोलनाचे कार्यकर्ते हरनाळी येथे उपोषण करते हनुमंत शिंदे यांची भेट घेण्यात आली.व अखेर तीन दिवसानंतर प्रशासनाच्या वतीने, पंचायत समिती अधिकारी, बिडीओ साहेब, कोंडलवाडी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक यांनी हरनाळी येथे उपस्थित राहून संबंधित, उपोषणकरत्याची मागणीची चौकशी केली असता दलित वस्तीत, पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याचे सिद्ध झाले आहे. तरी संबंधित प्रशासनाच्या वतीने 3 दिवसात दलित वस्ती येथे,पिण्याच्या पाण्याचे व्यवस्था करण्यात येईल असे,लेखी आश्वासन,दिल्यानंतर हनुमंत शिंदे यांचा आमरण उपोषण माघे घेण्यात आले.

हरनाळी येथील प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर, हनुमंत शिंदे यांचा आमरण उपोषण मागे.                                       
Previous Post Next Post