हुतात्मा पानसरे प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या सीमेवरील सैनिकासाठी रवाना . हुतात्मा पानसरे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन व क्रांती दिनाच्या निमित्ताने तयार केलेल्या राख्या व शुभेच्छापत्र सीमेवरील सैनिकांना आज पाठविण्यात आले. शाळेतील उपक्रमशील शिक्षक विठ्ठल हिमगिरे व अश्विनी रामोड, सविता नोरलावार, प्रणिता प्यादेकर यांनी कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना राखी बनवण्यासाठी मार्गदर्शन केले. राख्या बनवून घेतल्या त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध माध्यमांचा वापर करून शेकडो राख्या बनवून मुख्याध्यापक श्री पालकृतवार गंगाधर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या. आज झालेल्या कार्यक्रमात सेवानिवृत्त सुभेदार मेजर वाडीकर साहेब यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेऊन सदरील शुभेच्छापत्र व शंभर राख्या विविधबटालियनला पाठविण्यात आले. सदरील कार्यक्रमा चे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर पालकृतवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित सुभेदार मेजर इरना वाडीकर व शाळेचे ज्येष्ठ शिक्षक एल. आर. जाधव हे होते.सीमेवरील सैनिकबांधवांप्रति असलेले प्रेम हे राख्या व शुभेच्छा संदेश पाठवून नक्कीच सैनिकांचे मनोबल वाढेल. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या शुभेच्छा संदेश व राख्या सैनिक बांधवांना पाठवणे या नवोपक्रमाचे संस्थेचे सचिवविश्वनाथराव पाटील बन्नालीकर साहेबांनी तोंड भरून कौतुक केले. या उपक्रमासाठी केंद्रप्रमुख आबासाहेब उसके लवार यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या. सदरील उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.सदिल उपक्रम व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सवितानोरलावार. सुनीता शाहू. अश्विनी रामोड, प्रणिता प्यादेकर, विठ्ठल हिमगिरे, विठ्ठल नरवाडे, राजू सिदुलवार, रवींद्र राठोड, लक्ष्मण जाधव, विनायक बारदवार. हनुमंत शिंदे, बजरंग परसूरे, नविन लोकवाड सर, राठोड ताई, गुब्बी ताई, पंढरीनाथ दारमोड आदिनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र राठोड यांनी केले तर आभार विनायक बारदवार यांनी मांडले.धर्माबाद तालूका प्रतीनीधी सज्जन संतोष
byMEDIA POLICE TIME
-
0