यावल तालुक्यात उद्यापासून विशेष महसूल सप्ताह कार्यक्रम सुरू.उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार यांचे नियोजन. (यावल दि.३१( सुरेश पाटील ) राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री महसूल मंत्री यांच्या आदेशान्वये संपूर्ण राज्यात विशेष महसूल सप्ताह कार्यक्रम घेण्याचे आदेश असल्याने उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझिरकर यांनी यावल तालुक्यात विशेष महसूल सप्ताह कार्यक्रमाचे नियोजन आपल्या महसूल कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केले आहे.विशेष महसूल सप्ताह कार्यक्रमाचे स्वरूप पुढील प्रमाणे १ ऑगस्ट २०२५ रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून यात महसूल सप्ताह शुभारंभ करून त्यात प्रामुख्याने महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी,कर्मचारी, संवाद उत्कृष्ट अधिकारी / कर्मचारी पुरस्कार वितरण व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण समारंभ घेण्यात येईल.२ आगस्टला शासकीय जागेवर सण २०११ पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबापैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना सदर अतिक्रमित जागाचे पट्टे वाटप करणे बाबत कार्यक्रम घेण्यात येईल.३ तीन ऑगस्ट रोजी पाणंद /शिव रस्त्याची मोजणी करून त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड. ४ ऑगस्टला श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळ निहाय राबविणे.५ ऑगस्टला विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करून डीबीटी करून अनुदानाचे वाटप करण्यात येईल.६ ऑगस्टला शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व त्या अतिक्रमण मुक्त करणे तसेच शर्ट भंग झालेल्या जमिनी बाबत शासन धोरणानुसार ( नियमानुकूल करणे / सरकार जमा करणे ) याबाबत निर्णय घेतले जातील.७ ऑगस्टला " M - Sand धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे ( SOP प्रमाणे ) धोरण पूर्णत्वास नेणे आणि महसूल सप्ताहाची सांगता समारंभ करण्यात येईल. अशाप्रकारे यावल तहसीलदार यांनी आपल्या महसूल कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने विशेष महसूल सप्ताहाचे आयोजन केले असल्याची माहिती दिली.
byMEDIA POLICE TIME
-
0