नांदेड जिल्ह्यात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी .. (मारोती एडकेवार नांदेड / जिल्हा प्रतिनिधी )नांदेड : जग बदल घालुनी घाव सांगून गेले मज भीमराव, दलितांचे व्यथा व त्या दलित व्यक्तींचे कथा साहित्याच्या माध्यमातून जगाच्या येशीवर टांगणारे, पृथ्वी हे शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून दिन दलितांच्या तळ हातावर तरलेली आहे, असे जगाला सांगणारे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची, आज जयंती यानिमित्त नांदेड जिल्ह्यात,अनेक ठिकाणी अनेक शासकीय कार्यालयात, व सामाजिक क्षेत्रात,सामाजिक कार्यात,व समाजाने मोठ्या उत्साहाने जयंती साजरी करत आहेत,तरी डॉक्टर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती नाचून,न करता वाचून साजरी करण्याचा निर्णय अनेक जयंती मंडळांनी घेतला, याचंच उदाहरण हिप्परगा थडी जयंती मंडळाचा, नाचून न करता वाचून साजरी करण्याचा निर्णय घेतला व मंडळाच्या वतीने अभ्यासशिका, विद्यार्थ्यांसाठी निर्माण करण्याचं कार्य हाती घेण्यात आला. महाराष्ट्रात दोन तुकाराम होऊन गेले,एकाच्या अभंगांनी तर दुसऱ्याच्या पोवाडा आणि क्रांती घडवली,तुकाराम भाऊराव साठे आईचं नाव वालुबाई, आण्णा चे जीवन मात्र 49 वर्ष, क्रांती होण्यासाठी विशिष्ट वेळेची वाट पाहावी लागते, फारसा प्रकाशित न झालेले व्यक्ती महत्त्व जर दुर्लक्षित झालेले त्याचे साहित्य या दोन्हीची दखल केवळ महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारताने लक्ष देण्याची वेळ आली आहे. चार भिंतीच्या शाळेत प्रवेश मात्र दीड दिवसात,सोडली थेट लोकशाळेत, प्रवेश केला म्हणूनच,ते लोकशाहीर झाले,ते पदवीधर नव्हते, पण सुशिक्षित होते. पदवीधर सुशिक्षित असतात हा गैरसमज आहे. ज्यांच्याकडे, पदव्यांचे ढीगरी आहेत,त्यांना शिक्षणाचा गंध नाही,असा अनुभव लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या माध्यमातून जगाला दिसतोय. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा जन्म, एक ऑगस्ट 1920 व मृत्यू 18 जुलै 1969 रोजी झाला,गावकुसाबाहेर जन्माला आलेला सामान्य घराण्यात झोपडपट्टी जन्मलेल्या एक असामान्य तारा, असामान्य रत्न म्हणजे,अण्णाभाऊ साठे. वाटेगावात, गावच्या बाहेर राहणारे कुटुंब सन्मान कधीच पहिला नाही,आपल्या परिवाराला दिशा मिळावी, पोराच्या गाण्याने पोट भरणार नाही, अशी चिंता परिवाराला वाटत होती, म्हणून अण्णा आणि परिवाराने वयाच्या अकराव्या वर्षी 1931 साली वाटेगाव सोडलं, मुंबईच्या दिशेने सहा महिने वाटचाल करीत राहिले, कोणकोणते चटके सहन करावे लागतात असे सर्व प्रकार या जगाला लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या माध्यमातून दिसतो, सामान्य जनतेपर्यंत संयुक्त महाराष्ट्राचा लढा अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, व शाहीर गव्हाणकर या तिघांनी सामान्य जनतेत संयुक्त महाराष्ट्राचा आंदोलन पोहोचवलं, या महामानवाला अभिवादन व सलाम.

नांदेड जिल्ह्यात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी ..                                           
Previous Post Next Post