हिफरगा थडी सरपंच रहेबर यांनी आमदार महोद्यांकडे विनंती केले अतिक्रमण जागेंचा पट्टेवाटपाचा निर्णय, (आनंद कुरुडवाडे नांदेड़ ग्रामीण प्रतिनिधि बिलोली ) बिलोली: तालुक्यातील हिप्परगा थडी हे एक मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवत असलेला गावातील लोकांना आपल्या कच्च्या निवाराखाली राहुन आपले आयुष्य काढाव लागत आहे. प्रधानमंत्री आवास घरकुल योजनांमध्ये त्यांचे नावे येऊन देखील त्यांचा ग्रामपंचायतीला कुठलाही नमुना नंबर आठ चा दाखला नसल्या कारणाने त्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. या सर्वांचा विचार करून गावातील युवा सरपंच रहेबर ईनामदार यांनी हिप्परगा थडी येथील गायरान जमिनीवर वास्तव्यात असलेल्या नागरिकांना घरकुल बांधण्याची परवानगी द्यावी या संदर्भात आमदार जितेश अंतापुरकर साहेबांशी चर्चा केली व त्यापुढे आमदार साहेबांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना मॅडम सोबत चर्चा केली मग पुढे शासन परिपत्रक महसूल व वन विभाग क्र. एलइएन 10/2021/प्र.क्र.225/ज-1,दि.4 एप्रिल 2002 व तसेच शासन वनणफय क्र.सांकिणफ 2025/प्र.क्र. | 62/आस्था -1 (ई-1), दि.29 जुलै 2025 सर्वांसाठी घरे 2022 या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी अतिक्रमण नियमांत सुधारणा करण्याबाबत दि 16 फेब्रुवारी 2018 च्या नियमावली लागू करून जे लोक गावातील गावरान जागेवर कब्जा घेतला आहे त्यांना त्यांच्या पक्के घरे बांधण्यात यावे यासाठी प्रयत्न करून त्यांच्या हक्काची जागा उपलब्ध नसल्याने त्यांनी केलेल्या अतिक्रमण जागेवर त्यांना कायमस्वरूपी पट्टावाटप करून देण्यासाठी शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश संपादन करून गावातील कुटुंबांना बेघरापासुन घरघुलामध्ये सामिल करून देणारे असा एक नवीन आदर्श निर्माण करणारे युवा सरपंच रहेबर ईनामदार यांनी एक नवीन दिशा निर्माण करून समाजात एक आदर्श निर्माण केले असून त्यांचे गावातील लोकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

हिफरगा थडी सरपंच रहेबर यांनी आमदार महोद्यांकडे विनंती  केले अतिक्रमण जागेंचा पट्टेवाटपाचा निर्णय,        
Previous Post Next Post