आदिवासी संस्कृती जतन व्हावीप्रा.एल. एम.वळवी. श्री.व्ही.एस.नाईक महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिन साजरा. ( रावेर तालुका प्रतिनिधी सानिया तडवी रावेर)-रावेर येथील श्री.व्ही.एस.नाईक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला. प्रा.एल.एम.वळवी यांनी आदिवासी संस्कृती,बोलीभाषा,परंपरा याविषयी मार्गदर्शन केले.त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की,जगभरातील आदिवासी संस्कृती जतन व्हावी.आदिवासी समाजाच्या विविध परंपरा निसर्गाशी अनुरूप आहेत.माणसाच्या शाश्वत विकासासाठी निसर्गाचे रक्षण करणं हे आदिवासी समाज आपलं कर्तव्य मानतो.जल,जंगल,जमीन यासाठीचा संघर्ष आजही सुरू आहे.जगभरामध्ये आदिवासींच्या हक्कांचे हाणन होत आहे.यासाठी आदिवासींनी जन चळवळ उभारावी.असे आव्हान आपल्या भाषणातून प्राध्यापक एल. एम.वळवी यांनी केले.जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उपप्राचार्य प्रा.डॉ.एस.डी.धापसे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी अध्यक्षीय भाषण केले.विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.जी.आर.ढेंबरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.सूत्रसंचालन प्राध्यापक सी.पी. गाढे यांनी केले.आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्राध्यापक एस.डी.महाजन यांनी केले.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्रा.डॉ.ए.एन.सोनार,प्रा.डॉ.व्ही.बी. सूर्यवंशी,आय.क्यू.सी.समन्वयक डॉ.बी.जी.मुख्यदल,प्रा.एस.बी.धनले,प्रा.एन.ए.घुले,प्रा.चेतन सुतार ,प्रा. तेजस दसनूरकर तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यकमाच्या यशस्वीतेसाठी कर्मचारीश्री.सुनिल मेढे,आशिष घुगे श्रीमती एम.एस.आग्रवाल यांनी प्रयत्न केले.
byMEDIA POLICE TIME
-
0