**के. के. एम.महाविद्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी* (मानवत / वार्ताहर )*————————*आज दिनांक १ आगष्ट रोजी के. के.एम महाविद्यालयामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जयंतीला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे उपस्थित होते. उपप्राचार्य डॉ के. जी हुगे, मूल्य शिक्षण समिती प्रमुख प्राध्यापक डॉ.पंडित लांडगे, पर्यवेक्षक प्रा. अनिल कापसे,डॉ कैलास बोरुडे,डॉ.संदीप राठोड,प्रा संजय सूर्यवंशी उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रा.संजय सूर्यवंशी यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला ते म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांच्यावर कार्ल मार्क्स आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव होता. ते समाजसुधारक आणि साहित्य लेखक देखील होते. त्यांनी अनेक कथा, कादंबरी आणि कवितांचे लिखाण केले. अण्णा भाऊ साठे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. अण्णा भाऊ साठेंच्या साहित्याने अनेकांना प्रेरणा दिली. त्यांचे प्रेरणादायी विचार सुद्धा सर्वांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. त्यांनी पोवाडे, गीत आणि लावण्यांच्या माध्यमातून आपले विचार गरीब जाणते पर्यंत पोहोचवले. त्यांना लोकशाहीर पदवी दिली. त्यांनी मराठी भाषेत 35 कादंबऱ्या लिहिल्या. त्यांचे निधन 18 जुलै 1969 रोजी झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षीय समोर डॉ.भास्कर मुंडे यांनी केले ते म्हणाले की अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. अण्णा भाऊ साठेंच्या साहित्याने अनेकांना प्रेरणा दिली. त्यांचे प्रेरणादायी विचार सुद्धा सर्वांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत असे मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भितीपत्रकाचे विमोचन करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. संधीप राठोड यांनी केले तर आभार डॉ कैलास बोरुडे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील बहुसंख्य कर्मचारी आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.***
byMEDIA POLICE TIME
-
0