**पाथरी विधान सभा मतदार संघातील मौजे मानोलीकरांच्या रस्त्याची दयनीय अवस्था**. (बातमीदार / अनिल चव्हाण.**)——————————————*गाव तसं चांगल पण वेसीला टांगलं या मराठी म्हणी प्रमाणे पाथरी विधान सभा मतदार संघातील मौजे मानोली गावाच्या रस्त्यांची दैणीय अवस्था झाली असल्यामूळे आदर्श गाव असलेल्या मानोली गावातील लोकांची रस्त्यासाठी खडतर मार्गातून वाट काढण्याची पाळी आली आहे. शिवसेना , शेतकरी संघटनेचा जि. प. चा व पाथरी विधान सभेचा बाल्ले किल्ला समजला जाणारा कोल्हा मतदार संघातील मानोली मानवत मानोली सेलू या रस्त्याकडे आज लोक प्रतिनिधीचे लक्ष गेले नसल्यामूळे मानवत मानोली मार्ग असलेल्या सेलू या महामार्गा लगत असलेल्या १० किलो मिटर रस्त्याचा प्रश्न सूटला नाही त्यामूळे या रस्त्यावर प्रसिध्द नाणिज निवासी संत नरेंद्र स्वामी यांचा भव्य दिव्य असा आश्रम आहे. दरवर्षी लाखो भाविक भक्त दत्त जयंतीला येथे येतात मानवत पासून १० ते १२ किलो मिटर अंतरावर असलेल्या आश्रमाला काखेत कळसा अनं गावाला वळसा असा फेरा मारून पाथरी किंवा सेलू येथुन लाखो भाविक भक्तांना यावे जावे लागते. सर्व खडे महामार्गाला जोडण्याचा संकल्प शासनाने घेतला असून ही राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मानवत > मानोली > सेलू याकडे दूर्लक्ष होत असल्याने ग्रामीण भागातून संताप व्यक्त केला जात आहे. लोकप्रतिनिधींनी मानवत, मानोली मार्ग सिमूर गव्हाण पाटी पर्यंतच्या रस्त्याचा कायम प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी ग्रामीण भागातील जनते मधून होत आहे.रस्त्याच्या प्रश्नाकडे लक्ष न दिल्यास याचे पडसाद येणार्‍या निवडणूकीतून जनता दाखवून देईल अशी प्रतिक्रिया नागरीक व्यक्त करीत आहे.*

**पाथरी विधान सभा मतदार संघातील मौजे मानोलीकरांच्या रस्त्याची दयनीय अवस्था**.                            
Previous Post Next Post