"जळगावच्या सद्गुरू विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांना मोफत दफ्तर व शैक्षणिक साहित्य वाटप " सदगुरू एज्युकेशन सोसायटी संचलित,प्राथमिक विद्या मंदिर खेडी बु ".ता.जि.जळगाव येथे शालेय विद्यार्थ्यांना मोफत दफ्तर व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.या प्रसंगी संस्थेचे सचिव तसेच संस्थाचालक प्रा.डॉ.श्री. नारायण शंकर खडके तसेच जळगाव मनपाच्या स्थायी समितीच्या माझी सभापती वर्षा खडके, मुख्याध्यापक गायत्री भंगाळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दफ्तर व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.इ.१ली ते ७वी च्या विद्यार्थ्यांना मान्यवराचा हस्ते दफ्तर व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.याप्रसंगी गणेश लोडते यांनी सूत्रसंचालन व भूषण जोगी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुनम चौधरी,शिल्पा झोपे,जावेद तडवी,सोपान पाटील,ज्योती महाले,सविता चव्हाण,प्रमोद चौधरी आदींचे सहकार्य लाभले.
byMEDIA POLICE TIME
-
0