शेतकरी, ज्येष्ठ नागरिक आणि मराठा समाजाच्या हक्कांसाठी एकवटला मराठा महासंघ नायगाव आमदारांना दिले निवेदन. (गणेश कदम बिलोली ग्रामीण प्रतिनिधी) मराठा महासंघाच्या वतीने शेतकरी, ज्येष्ठ नागरिक आणि मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील होटाळकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आ. राजेश पवार यांची भेट घेऊन त्यांना सहा प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनातून सरकारने तातडीने लक्ष घालून मागण्या मान्य कराव्यात, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.आ. पवार यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनातून समाजाच्या आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात आली आहे. यामध्ये पीकविम्याची जाचक अट रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणे, सिंचन विहीर व गायगोठा यांसारख्या वैयक्तिक लाभांच्या योजनांचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करणे, वर्षांवरील महिला-पुरुषांसाठी पेन्शन योजना लागू करणे, फळबाग लागवडीसाठीचे अनुदान वाढवणे, ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६५ वरून ६० वर्षे ६० यावेळी शिष्टमंडळात रणजित देसाई, हणमंत शिंदे, साई पाटील मोकासदाटेकर, परमेश्वर पाटील बेंद्रीकर, किरण पाटील जिगळेकर, बालाजी पाटील, संभाजी जाधव, अनिल पाटील यांच्यासह महासंघाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.करणे आणि मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळवून देणे, अशा सहा प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. राष्ट्रीय मराठा महासंघ हे मराठा समाजाच्या हक्क, आरक्षण, शिक्षण, शेती आणि सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर लढा देणारे संघटन असून, छत्रपती शिवरायांच्या विचारांवर समस्या आणि राष्ट्रहिताच्या उद्दिष्टांवर संघटनेचे कार्य केंद्रित आहे. राज्यातील मराठा समाजातील शेतकरी, तरुण आणि नागरिकांच्या शासनापर्यंत पोहोचवून त्या सोडवणे हेच संघटनेचे प्रमुख कार्य असल्याचे जिल्हाध्यक्ष होटाळकर यांनी सांगितले.
byMEDIA POLICE TIME
-
0