जनधन बँक खातेदारांनी तात्काळ के-वायसी करावे-शाखाधिकारी देशमुख. ( आंनद करूडवाडे नांदेड ग्रामीण प्रतिनिधि बिलोली ) : बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील भारतीय स्टेट बैंक शाखेत प्रधानमंत्री जनधन योजने अंतर्गत खाते काढण्यात आलेल्या खातेदारापैकी ज्यांनी अद्यापही के वायसी केले नाही, अशा सर्व खातेदारांनी तात्काळ के-वायसी करून घ्यावे, असे आवाहन शाखाधिकारी हावगीराव देशमुख यांनी केले आहे.आदमपुरसह इतर १० गावांना शेतकरी कर्ज पुरवणारी व इतर योजनेसाठी दत्तक बँक म्हणून बिलोली तालुक्यातील रामतीर्थ तालुक्याताल येथील भारतीय स्टेट बैंक काम करते. या बँकेत १० वर्षापूर्वी प्रधानमंत्री जनधन योजने अंतर्गत अनेक नागरिकांनी आपले बैंक खाते उघडले. त्यापैकी तब्बल ६१२० लोकांनी अद्याप केवायसी केले नसल्याने त्यांच्या बँक खात्याचे व्यवहार पूर्णतः बंद पडले आहेत. आरबीआयच्या निर्देशानुसार भारतीय स्टेट बैंक शाखा रामतीर्थच्या वतीने काही गावात शिबिराचे आयोजन करून जनधन बँक खातेदार असणाऱ्या नागरिकांचे बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रा मार्फत के-वायसी करून घेण्यात येत आहे. त्यामुळे केवायसी न केलेल्या जनधनच्या खातेदारांनी शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी व बँकेची व्यवहार करण्यासाठी बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात किंवा प्रत्यक्ष रामतीर्थ येथील एसबीआय बँक शाखेत येऊन केवायसी करून घेणे आवश्यक आह, असे बँकेचे शाखाधिकारी हावगीराव देशमुख यांनी सांगितले.
byMEDIA POLICE TIME
-
0