⦁ तोरणमाळ पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा दौरातोरणमाळ (कैलास शेंडे जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार )नंदुरबार: जिल्ह्यातील निसर्गरम्य आणि पर्यटकांचे आकर्षण ठरणाऱ्या तोरणमाळ परिसराच्या पर्यटन विकास कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आज प्रत्यक्ष भेट दिली. या दौऱ्यात पर्यटनाशी संबंधित अनेक ठिकाणांची पाहणी करण्यात आली व विकास कामांना गती देण्यासाठी संबंधित विभागांना ठोस निर्देश देण्यात आले.जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी सिताखाई पॉईंट, झिप लाईन लोकेशन, थीम पार्क, बोटनिकल गार्डन, बोटिंग पॉईंट, तसेच तोरणमाळ हॅट्स या महत्वाच्या स्थळांना भेट दिली. यानंतर शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेऊन पर्यटनवाढीच्या दृष्टीने आवश्यक कामांचा आढावा घेतला.PWD विभागास मुख्य व अंतर्गत रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश.होम स्टे प्रकल्पासाठी तत्काळ विद्युत जोडणी देण्याबाबत सूचना.होम स्टेच्या इंटिरियर देखभाल व सौंदर्यीकरणासाठी त्वरित उपाययोजना.वन विभागास पर्यटकांना सफारीसाठी आवश्यक वाहने खरेदी करण्याची कार्यवाही.झिप लाईन प्रकल्पासाठी बॅटरीवर चालणाऱ्या पर्यावरणपूरक वाहनांची खरेदी.थीम पार्कसाठी प्रस्तावांची सविस्तर तयारी करून पुढे सादर करण्याचे निर्देश.या दौऱ्यात माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा, वन व पर्यटन विभागात समन्वय साधून कामे करण्यावर भर देण्यात आला. स्थानिकांचे उत्पन्न वाढवणे, महिलांना स्वयंपूर्ण बनवणे आणि परिसरात शाश्वत पर्यटन संधी निर्माण करणे हे या दौऱ्याचे प्रमुख उद्दिष्ट होते.या बैठकीस MAVIMच्या कांता बनकर मॅडम, जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता S.D. पवार, सहाय्यक वनसंरक्षक संजय साळुंके (शहादा), वनक्षेत्रपाल महेश चव्हाण (तोरणमाळ), तहसीलदार अक्राणी सपकाळे साहेब, तसेच तोरणमाळ वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जिल्हाधिकारी मॅडम यांच्या दौऱ्यामुळे तोरणमाळ पर्यटन विकासाला नवी दिशा आणि गती मिळणार आहे, अशी स्थानिक जनतेत आणि प्रशासनात सकारात्मक भावना दिसून आले

 तोरणमाळ पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा दौरातोरणमाळ      
Previous Post Next Post