अवैध देशी दारू वाहतुकीवर पोलिसांचा कारवाईचा छाप 46,000 किमतीचा मुद्देमाल जप्त! (महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती :-दिनांक 24 ऑक्टोबर रोजी मांजरी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मटण मार्केट, मांजरी येथे छापा टाकून अवैध देशी दारू वाहतूक करणाऱ्या एका आरोपीस अटक केली. मुखबीरच्या खबरेवरून पोलिसांनी छापा टाकला असता आरोपी वैभव कुशाब साव, रा. मांजरी याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून देशी दारूच्या 400 बॉटल्स किंमत 16,000 रुपये व मोटरसायकल किंमत 30,000 रुपये असा एकूण 46,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीत आरोपी साव यांनी हा माल विलास भोंगळे, रा. वरोरा यांचा असल्याचे सांगितले. तसेच सदर देशी दारूचा साठा “भोंगळे अँड सन्स” देशी दारूच्या भट्टीमध्ये घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने आरोपी विलास भोंगळे, रा. वरोरा याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन मांजरी येथे कलम 65(अ) व 83 महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, मा. अपर पोलीस अधीक्षक, मा.संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी ठाणेदार पोलिस स्टेशन मांजरी सहाय्यक पोलिस निरीक्षक धोंगडे, ग्रेट पो. उ.प.नि. मनोहर दडमल, पो.अ. अनिस शेख, प्रमोद मिळमिले व रवी कन्नाके यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास स. फौ. रमेश तुरानकर करीत आहेत.
byMEDIA POLICE TIME
-
0