*वडगाव आनंद मधे श्री मुक्ताई गोवर्धन पूजेचे आयोजन* वडगाव आनंद दि. २२- पारंपरिक होऊ घातलेल्या वरुण राजाचे आभार मानन्यासाठी श्री मुक्ताई गोवर्धन पूजन तळ्याची वाडी, आळेफाटा येथे दि.२२ ऑक्टोबर रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन वडगाव आनंद ग्रामस्थांनी मोठया उत्साहात दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील केले होते. कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी ७ वाजता मांडव डहाळे, ८ वाजता अभिषेक ,९ वाजता महाआरती,९:३० वाजता उपस्थित मान्यवरांचा सत्कार तथा मनोगत, १० वाजता महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते.अशा प्रकारे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाला उपस्थित ग्रामपंचायत सदस्य संदीपशेठ गडगे, संतोषशेठ पादिर, कल्पनाताई पादीर, मा.ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय गडगे, शिवाजी केवाळ ,गोमाता दूध संस्था चेअरमन अशोक शेठ गडगे, संकेत शेठ गडगे, विजय केवाळ ,जय मल्हार क्रांती संघटनेचे सदस्य,गणेश मोरे,संतोष मोरे,अक्षय भंडलकर,आकाश मोरे, तसेच मंदिरा साठी जागा देण्याचे सहकार्य केले. खंडूशेठ मोरे, सुरेशशेठ मोरे यांनी मंदिराच्या जीर्णोद्धार करण्याची मागणी केली असता, सर्वांनी त्यांच्या मागणीला हिरवा कंदील दाखवून संमती दिली.

*वडगाव आनंद मधे श्री मुक्ताई गोवर्धन पूजेचे आयोजन* 
Previous Post Next Post