*वडनेर येथील आगीत भस्मसात झालेल्या दांडेकर कुटुंबाला बाजार समितीचा मदतीचा हात*. (हिंगणघाट प्रतिनिधी दानिश शेख:-) दिनांक २१/१०/२०२५ वडनेर येथील शिल्पा रामेश्वरराव दांडेकर यांच्या घराला दि 19 च्या पहाटे च्या वेळी शॉर्ट सर्किटने आग आगली. त्या आगीत त्यांचे घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. दांडेकर ‌कुटुंबीय उघड्यावर आले.या घटनेची माहिती मिळताच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँड सुधीर कोठारी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. व आपतग्रस्त कुटुंबियांचे सांत्वन केले. व बाजार समिती द्वारे घर बांधणीचे साहित्य १५००० धनादेश साहित्य उपलब्ध करून दिले. व या दांडेकर कुटुंबांच्या जखमेवर फुंकर घातली. लवकरात लवकर दखल घेऊन त्या कुटुंबाला मदतीचा हात देण्यात आला. यावेळी अँड सुधीर कोठारी यांनी शासनाने तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची विनंती प्रशासनाला केली आहे. याप्रसंगी सर्वश्री हिंगणघाट बाजार समितीचे संचालक श्री उत्तमराव भोयर, कृष्णाजी महाजन, माजी ग्रा. प. सदस्य गुरुदयालसिंग जुनी, हिंगणघाट खरेदी विक्री संघांचे संचालक राजू भोरे, नारायण कुंभारे, विठ्ठल पोहाणे, प्रशांत दरोडे, अफरोज पठाण, प्रफुल देवतळे, अभय वर्मा, विनोद भोयर, वसंत गलांडे, दिनेश चंदनखेडे, गणेश जैस्वाल, साई चंदनखेडे, ओम चंदनखेडे, आकाश आढळ,सतीश कारामोरे, फिरोज शेख, मनोहर सुपारे, गणेश कुरसंगे, आसिफ शेख, शाकिब सय्यद, अनिल भोयर, देवराव भुते, अरुण लोणकर, अशफाक कुरेशी, सुरेश इटनकर, सुरज सालेकर, पंकज धात्रक, मोहन धात्रक, सागर भोरे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

*वडनेर येथील आगीत भस्मसात झालेल्या दांडेकर कुटुंबाला बाजार समितीचा मदतीचा हात*.                                  
Previous Post Next Post