आई तुळजा भवानी महालक्ष्मी (सुपारी माता) ट्रस्ट बोरगाव( मेघे ) व अतुल शेंदरे मित्र परिवार आत्महत्या ग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत व इतरांना धान्य किराणा किट वाटप.. वायफड येथे गेल्या एक ते दिड महिन्या आधी वायफड येथील शेतकरी स्व हनुमान खडसे यांनी पडलेला ओला दुष्काळ व डोक्यावर झालेले लाखोचे कर्जला कंटाळून आत्महत्या केली. त्यांचे सात्वन करण्याकरिता बरीच स्थानिक व बाहेरील नेते मंडळी गेली बरेच मोठे मोठे आश्वासन दिले. बरेच दिवस लोटून गेले दिवाळी सारखा सण जवळ आला परंतु अजूनही शासनाकडून व इतर कोणतीच मदत खडसे कुटूंबियांना मिळाली नाही.म्हूणन आपल्या कडून खडसे कुटूंबाला काही सहकार्य व्हावे. या उद्देशानी आई तुळजा भवानी . ट्रस्ट बोरगाव ( मेघे ) व अतुल शेंदरे मित्र परिवाराच्या वतीने वायफड जाऊन कुटुंबाची भेट घेतली व त्या अन्न धान्य किराणा सामान व आणि अर्थ साह्य म्हणून दहा हजार रुपयाचा धनादेश देण्यात आला. मुलीच्या शिक्षणा करिता पुन्हा जमेल ति मदत करू व शासनाकडून मदत मिळून देण्यास सहकार्य करू असे सांगण्यात आहे इतर आजूबाजूच्या गावामध्ये सुद्धा गरजूना किराणा सामान किट चे वाटप करण्यात आले. यावेळीस आई तूळजा भवानी महालक्ष्मी ट्रस्ट बोरगाव चे अध्यक्ष दिनेश (माऊली ) विशस्त, अतुल शेंदरे, राजेश गांधी लालू भाऊ मिश्रा दर्शन सराफ, नितीन डफळे, अश्विन परमार मनोज सातव, नितीन शिंदे, अनुराग गोयलका गौतम टिबडेवाल योगेश तापडिया पवन फटिंग चेतन सोनुले चेतन वाघमारे अमित उईके चेतन चाफले अमोल ठाकरे गजानन रोहणकर, अशोक राऊत, किसनाजी वांदीले, विजू कोटागले, रुपाली चौधरी मीनल नवले, वनिता वैद्य, प्रिया शिनपुरे वंदना ठोंबरे, विजया वंदिले, शारदा ठाकूर व आधी गावकऱ्यानी उपस्थित राहून सहकार्य केले.

आई तुळजा भवानी महालक्ष्मी  (सुपारी माता) ट्रस्ट बोरगाव( मेघे )  व अतुल शेंदरे मित्र परिवार आत्महत्या ग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत व इतरांना धान्य किराणा किट वाटप..                                                                                   
Previous Post Next Post