चोपडा तालुक्यातील तावसे बुद्रुक येथे बिबट्या दिसल्याने गावात भीतीचे वातावरण .. (!!चोपडा (सजीव शिरसाठ ) तावसे बु ॥ तालुक्यातील तावसे बुद्रुक येथे बिबट्या दिसल्याने गावातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण दिसून येत आहे तावसे बुद्रुक येथील चामुंडा माता मंदिराजवळ बिबट्या दिसल्याचे नागरिकांनी सांगितले तावसे बुद्रुक येथील सरपंच रेखाबाई किशोर चौधरी यांनी वनविभागाला या घटनेची माहिती दिली याच्या आधी देखील बिबट्या दिसल्याची माहिती सरपंच व गावातील नागरिकांनी वनविभागाला दिलेली होती असे सरपंच यांनी सांगितले पण वनविभागाने यावर गावात येऊन पाहणी केली असता त्यांना कुठल्याही प्रकारचे बिबट्याचा पायांची निशान दिसून आले नाहीत असे  सारिका कदम मॅडम सांगितले गावात सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे यावर वन विभागाने लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करावे असे गावातील सरपंच,पोलीस पाटील व नागरिकांनी वनविभागाला सागीतले आहे गावात बिबट्या दिसल्या कारणास्तव नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी असे देखील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी  तावसे बुद्रुक,कुरवेल व खाचणे या गावातील नागरिकांनी रात्री बाहेर निघताना योग्य ती दक्षता घ्यावी असे वनविभागातर्फे सांगण्यात आले आहे

चोपडा तालुक्यातील तावसे बुद्रुक येथे बिबट्या दिसल्याने गावात भीतीचे वातावरण ..                                                                   
Previous Post Next Post