२५ विधवा महिला व निराधार महिलांना भाऊबीज निमित्ताने साडी चोळी भेट -- आदर्श ग्रामपंचायत अधिकारी श्री सुरेश गांवडे _____________________________. मंगरूळनाथ--दगडात देव पाहत नाही आम्ही, माणसांची करतो आरती, रंजल्या गांजल्यांच्या सेवेस कर आमुचे सरसावती**सदा मानव सेवेला देह झिजू दे, घडू दे हरी आता हेचि घडू दे*विधवा आणि भाऊबीज यांचा संबंध भावनिक आणि सामाजिक स्तरावर महत्त्वाचा आहे, जिथे काही संस्था आणि गट विधवा महिलांना सन्मान आणि आदर देण्यासाठी भावनिक बंध तयार करतात. काही ठिकाणी विधवा महिलांना भाऊबीज सणात सहभागी करून, त्यांना सन्मानित आणि समाजात समावेशित करण्याचा प्रयत्न केला जातो, जेणेकरून त्यांचे एकटेपण कमी होईल. हीच सामाजिक बांधिलकी जपत आज *ग्रामपंचायत साखरडोह* चे *ग्रामपंचायत अधिकारी श्री सुरेश पाटील गावंडे* व त्यांच्या *पत्नी सौ अर्चनाताई सुरेश गावंडे* यांनी आजच्या भाऊबीज निमित्त गावातील *२५* विधवा व निराश्रित महिलाना माहेरची साडी चोळी व फराळ देऊन भाऊबीज साजरी केली. आपल्या उत्पन्नातील *१०%हिस्सा* दरवर्षी सामाजिक व धार्मिक कार्यावर खर्च करणारे शेजारच्या *चिखलागड* या गावातील रहिवाशी असलेले व राज्य शासना चा *सन२०१९/२०* या वर्षीचा *आदर्श ग्रामसेवक* पुरस्कार प्राप्त *श्री सुरेश पाटील गावंडे* व दाम्पत्य दरवर्षी गावाप्रती असलेल्या सामाजिक भावनेतून सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. अशा कार्यक्रमातून विधवाना एक सुरक्षित व प्रेमळ वातावरण मिळुन एकटेपण कमी होण्यास मदत होते. त्यांना सन्मानित केल्यामुळे त्यांच्या भावनांचा आदर केला जातो. यावेळी त्यांचे सुपुत्र स्वराज व सुकन्या सायली सह सामाजिक कार्यकर्ते गणेश भोयर, जनार्दन आगुलदरे, ग्रामपंचायत कर्मचारी उमेश चव्हाण, संजीव भगत, विजय भगत, केंद्र चालक सौ. रेखा मिलिंद पखाले व विशाल भारसाखळे उपस्थित होते. निराश्रीता सोबत भाऊबीज साजरी झाल्यामुळे त्या महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.

२५  विधवा महिला व निराधार महिलांना भाऊबीज निमित्ताने साडी चोळी भेट -- आदर्श ग्रामपंचायत अधिकारी श्री सुरेश गांवडे                
Previous Post Next Post