*अकोला एम.आय.डी.सी. मधील ॲग्रो मॅक्स कंपनीत धाडसी चोरी; ६९ तुरीचे कट्टे जप्त, ६ आरोपींना अटक*

*अकोला एम.आय.डी.सी. मधील ॲग्रो मॅक्स कंपनीत धाडसी चोरी; ६९ तुरीचे कट्टे जप्त, ६ आरोपींना अटक*

(मीडिया पोलिस टाईम जिल्हा विभागीय संपादक इमरान खान) 

अकोला: एम.आय.डी.सी. परिसरातील ॲग्रो मॅक्स कंपनीच्या गोदामातून ३ लाख ३१ हजार २०० रुपये किमतीचे तुरीचे ६९ कट्टे चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन अकोला येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी अत्यंत चातुर्याने तपास करत ६ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीचा माल आणि गुन्ह्यात वापरलेली कार, असा एकूण ९ लाख ३१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.घटनेचा तपशीलॲग्रो मॅक्स कंपनीचे सुपरवायझर फिर्यादी निलेश कमलकिशोर बिचकुंदे (वय ४० वर्षे, रा. दुबेवाडी, अकोला) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक २९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजता ते त्यांचे सहकारी शाम ढोकणे आणि आशिष व्यवहारे यांच्यासह गोदाम बंद करून घरी गेले होते. दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजता जेव्हा ते पुन्हा गोदामावर आले, तेव्हा त्यांना मागच्या बाजूचे शटर वाकलेले दिसले. गोदामात तपासणी केली असता, ६० किलो वजनाचे ६९ तुरीचे कट्टे (किंमत ₹३,३१,२००/-) अज्ञात चोरांनी पळवल्याचे उघड झाले. याप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ३९४/२०२६, कलम ३०५, ३३४(१) बी.एन.एस. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिसांनी अटक केलेले आरोपीगोपनीय बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी खालील ६ आरोपींना ताब्यात घेतले आहे:गणेश कुंजीलाल लांजेवार (वय ३२ वर्षे, रा. शरद नगर, शिवर, अकोला)अमित राजेश पांडे (वय २६ वर्षे, रा. पांडे कॉलणी, कुंभारी, अकोला)शुभम अशोक खडसे (वय २५ वर्षे, रा. कुंभारी, अकोला)स्वप्नील अशोक दांडगे (वय २९ वर्षे, रा. पांडे कॉलणी, कुंभारी, अकोला)राजा मन्सु धुर्वे (वय २९ वर्षे, रा. चिखली, ता. चिखलदरा, जि. अमरावती)शरिफ खान रशीद खान (रा. सावकर प्लॉट, मालेगांव, जि. वाशिम)जप्त करण्यात आलेला मुद्देमालतुरीचे कट्टे: ६० किलो वजनाचे ६९ कट्टे (किंमत ₹३,३१,२००/-)चारचाकी वाहन: गुन्हा करण्यासाठी वापरलेली कार (क्र. MH 30 BD 5681, किंमत ₹६,००,०००/-)एकूण जप्त मुद्देमाल: ₹९,३१,२००/-पोलीस पथकसदर कौतुकास्पद कामगिरी अकोल्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. अर्जित चांडक साहेब, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. बी. चंद्रकांत रेड्डी, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. सुदर्शन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे ठाणेदार सपोनि विजय जाधव, पोहेकॉ विजय अंभोरे, पोहेकॉ सतिश प्रधान, आणि पोकॉ निलेश वाकोडे यांनी हा गुन्हा उघडकीस आणला. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ विजय अंभोरे करत आहेत.
Previous Post Next Post