*विवेकानंद दिग्विजय दिन जिल्हास्तरीय शालेय विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धेत कु. भक्ती श्रीकृष्ण वाघ हिने प्रथम क्रमांकाने मारली बाजी*

*विवेकानंद दिग्विजय दिन जिल्हास्तरीय शालेय विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धेत कु. भक्ती श्रीकृष्ण वाघ हिने प्रथम क्रमांकाने मारली बाजी*

~~~~~ अकोला जिल्हा प्रतिनिधी  

      दिनांक 14 आलेगाव विवेकानंद दिग्विजय दिनानिमित्त संत सावता महाराज सत्संग भवन आलेगाव येथे स्वामी विवेकानंद प्रज्ञा प्रतिभा निकेतन आलेगांवच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना विवेकानंदांच्या तेजस्वी, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचा परिचय होऊन त्यांच्या जीवनात प्रेम - एकाग्रता उत्साह - आत्मविश्वास अशा नैतिक गुणांचा विकास व्हावा, व त्यांच्यातील वक्तृत्वं गुण विकसित व्हावे, या उदात्त हेतूने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार बाळापूर तथा भाजप नेते मा. श्री. बळीरामजी सिरसकार यांच्या शुभ हस्ते विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन, तथा दिप प्रज्वलन व रिबन कापून करण्यात आले.

 याप्रसंगी त्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना विवेकानंदांच्या व्यक्तिमत्त्वामधून प्रेरणा घेऊन स्वतःचे जीवन उज्वल व आनंदी बनविण्यासाठी प्रयत्नरत रहावे, असे आवाहन केले. स्पर्धेअंती तज्ञ परीक्षकांनी मूल्यमापन करून, एकूण स्पर्धकांमधून बक्षीस पात्र विद्यार्थ्यांची निवड केली. प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेल्या शिवशंकर उरळ विद्यालयाची कु.भक्ती श्रीकृष्ण वाघ हिला ५००१ /- रुपये स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन श्री सुनील राऊत, युवा उद्योजक यांचे शुभ हस्ते गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांक बक्षिस कु. खुशी महेंद्र पद्ममने, सुधाकरराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय शेकापूर हिला रोख- ४००१ /- रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन तर श्रीमती पद्माबाई जैन महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री अनिल जैन यांचे शुभ हस्ते सन्मानित करण्यात आले. तृतीय क्रमांक बक्षिस - कु. तन्वी दिनेश गावंडे, तुळसाबाई कावल विद्यालय, पातूर हिला रोख - ३००१ /- रुपये, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन आलेगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष यांच्यावतीने प्राचार्य श्री महाविर जैन यांचे शुभ हस्ते गौरविण्यात आले, तर प्रोत्साहन बक्षीस कु. आर्या गणेश जाधव, जे. आर. डी. विद्यालय, अकोला हिला रोख - २००१ /- रुपये, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन युवा सामाजिक कार्यकर्ते श्री निलेश कापकर यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. अकोला अकोट तेल्हारा मूर्तिजापूर बाळापूर पातुर या तालुक्यांसह अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा महाविद्यालयातून एकूण 41 व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक, पालक, बंधू-भगिनींसोबत स्पर्धकांनी सहभागी होऊन, विवेकानंदांना अपेक्षित युवक या विषयावर व्यक्त होत, विवेकानंदांना अपेक्षित असलेला निर्व्यसनी, सुदृढ शरीराचा, निरोगी मनाचा, विवेकी विचाराचा, नैतिक मूल्यांचे पालन करणारा, विद्यार्थी धर्माचे पालन करून ज्ञान प्राप्ती करणारा, स्वतःसह इतरांचे जीवन उज्वल करणारा, आणि स्वतःसह आपल्या आई-वडिलांवर आणि देशावर प्रेम करणारा युवक असावा असे मत व्यक्त करून उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शक शिक्षक बंधू भगिनींसोबतच स्पर्धकांची उपस्थिती विशेष लक्षणीय ठरली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माळी सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद भाऊ गिरे गुरुजी तर प्रमुख पाहुणे म्हणून आलेगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री अक्षय जैन, माजी जी.प.सदस्य रमण जैन,पत्रकार श्रीधर लाड, अब्दुल कदिर, माळी सेवा मंडळाचे सदस्य श्री भास्कर गिऱ्हे संतोष काळपांडे, विवेकानंद प्रज्ञा प्रतिभा निकेतनचे अध्यक्ष अशोक गिऱ्हे,उपाध्यक्ष मनोहर उगले, सचिव रामेश्वर राखोंडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख ह.भ.प. जगन्नाथ महाराज तायडे, कार्यवाह राजेश काळपांडे, राजेश बोचरे इत्यादी विचारपीठावर उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक विवेकानंद आश्रम हिवरा बुद्रुकचे विषय तज्ञ श्री विजय मेटांगे, श्री विजय गोसावी, श्री पंडित नप्ते, श्री मंगेश थुट्टे ( संस्कृत व भाषा तज्ञ ), संजय जटाळे या शिक्षक बंधूंनी परीक्षण करून बक्षीस पात्र विद्यार्थ्यांची निवड केली. बक्षीस वितरण प्रसंगी मान्यवरांसह अत्रिनंदन तायडे, शशिकांत काळपांडे, भास्करराव बोचरे, शामराव काळपांडे, सुधाकर गिऱ्हे गोपाल इंगळे, गणेश काळपांडे, गजानन येणकर, गजानन तायडे, मोहन मावलकर, जगदीश राऊत, नामदेव निखाडे, अनिल काळपांडे, गणेश बोचरे, रमेश बंड, गौरव काळपांडे, रमेश अढाऊ इत्यादी गावातील मान्यवरांसह स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी नूतन विद्यालय आलेगाव चे मुख्याध्यापक श्री राठोड,महावीर जैन, अनंत धाईत, मांगूळकर, तेलगोटे यांचे सह शाळांमधील विद्यार्थ्यांची विशेष उपस्थिती होती. दिवसभर चाललेल्या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी स्वामी विवेकानंद प्रज्ञा प्रतिभा निकेतन मधील विद्यार्थी तसेच स्वयंसेवक विद्यार्थी यांनी अथक प्रयत्न करून, कार्यक्रम यशस्वी केला. निकेतनची विद्यार्थी कु. प्रियंका गणेश उमाळे हिने उत्कृष्ट सूत्रसंचालन केले व शेवटी - उठा जागे व्हा..., ध्येय सिद्धी पर्यंत थांबू नका...! विवेकानंदांच्या या गजराने स्पर्धेचा समारोप करण्यात आला.

✍️संतोष उपरवट
मीडिया पोलीस टाईम अकोला जिल्हा.प्रतिनिधी✍️
Previous Post Next Post