जरांगे पाटलांची प्रकृती खालवली;आंदोलनावर ठाम,महंत शिवाजी बाबा महाराज यांचा उपचाराचा अग्रह, जरांगे पाटलांवर पाटोद्यात उपचार..

जरांगे पाटलांची प्रकृती खालवली;आंदोलनावर ठाम,महंत शिवाजी बाबा महाराज यांचा उपचाराचा अग्रह, जरांगे पाटलांवर पाटोद्यात उपचार..

(बीड/प्रशांत बाफना: विभागीय  संपादक)

मुंबईतील आझाद मैदानामध्ये आंदोलनास पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर ही आंदोलनावर ठाम जरांगे पाटील बुधवारी (दि.15) अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघाले. अंतरवाली सराटी पासून पाटोदा (जि. बीड) पर्यंत लाखो समाजबांधवांनी जरांगे पाटलांची अभूतपूर्व स्वागत केले. त्यामुळे जरांगे पाटील यांना मुक्काम ठिकाणी पाटोदा पोहोचण्यास मध्यरात्रीचे 2:00 वाजले. उपस्थितीतांना मार्गदर्शन करताना जरांगे पाटील यांना आरोग्याचा त्रास जानवत होता. मात्र त्यांनी आरोग्य समस्याची तमा न बाळगता उपस्थितांना मार्गदर्शन केले. पहाटे अचानक प्रकृती खालवल्याने नगद नारायण गडाचे महंत शिवाजी बाबा महाराज यांच्या आग्रहास्तव जरांगे पाटील यांनी उचार घेतले. 


मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी सरकारला अल्टीमेट देत जरांगे पाटील यांनी मंगळवारी (दि.15) अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे कूच केली. बीड जिल्ह्यातील पाटोदा, श्रीगोंदा, हडपसर, खोपोली येथे मुक्कामानंतर जरांगे पाटील दि. 19 सप्टेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू करणार आहेत. मागण्यांवर ठाम जरांगे पाटील यांनी सरकारकडे एकून 15 मागण्या मांडल्या आहेत. 


दरम्यान, एकून 15 पैकी 12 मागण्या मान्य केल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे. सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा निष्फळ झाल्यानंतर जरांगे पाटील यांनी सरकारला 12 सप्टेंबर पर्यंत अल्टीमेट दिला होता. मात्र, सरकार मागण्यांकडे चालढकल करत असल्याचा आरोप करत जरांगे पाटील यांनी ‘ नाक दाबल्या शिवाय तोंड उघडणार नाही’ अशा भावना व्यक्त केल्या. मंगळवारी (दि.15) मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार जरांगे पाटील यांनी मुंबई आझाद मैदान पोलिसांकडे परवानगीचा अर्ज केला. मात्र सणाच्या कालावधीसह मागील आंदोलनाचा दाखला देत कायदा सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी जरांगे पाटील यांना परवानगी नाकारली. 


दरम्यान, जरांगे पाटील यांनी दुसर्‍यांदा परवानगीचा अर्ज दिला असता तोही आझाद मैदान पोलिसांनी फेटाळत काही कारणंमिमास नमूद केली. पोलिसांच्या भूमिकेवर संतप्त होत मराठा समाजास अवाहन करत जरांगे पाटील यांनी मंगळवारी (दि.15) एकटेच मुंबईच्या दिशेने निघाले. जरांगे पाटीलयांनी समाजास मी एकटाच मुंबईला जात आहे, माझ्यासोबत कोणीही येणार नाही. पोलिसांनी गर्दी आणि कायदा सुव्यवस्थेचे कारण दिले आहे. 


मा. उच्च न्यायालयाने आंदोलन करण्यापासून कोणी रोखू शकत नाही, पण परवानगी व इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे न्यायदेवता आम्हाला न्याय देणार आहे. त्यामुळे माझ्यासोबत कोणीही येऊ नये, मी वेळ पडल्यास तुम्हाला सर्वांना मुंबईला बोलावील. उपोषण सुरू ठेवूनच मी मुंबईकडे कूच करणार असल्याचे सांगत जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच करण्याचा मार्ग जाहीर केला.

नियोजित आंदोलनासाठी जरांगे पाटील यांनी मंगळवारी (दि. 15) सकाळी 11:00 वाजता अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे कूच केली. अंतरवाली, वडीगोद्री, शहागड (ता.अंबड) ,गेवराई (जि.बीड), पाडळशींगी, बीड, मांजरसुंबा मार्गे मध्यरात्री 2:00 वाजताच्या सुमरास जरांगे पाटील पाटोदा (नियोजीत मुक्काम ठिकाण) येथे पाहोचले. 


उपोषण सुरू ठेवून मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या जरांगे पाटील यांचे महाकाळा, अंकुशनगर येथे त्यांच्या कुटुंबीयांनी औष्कण करत सरकारला इशारा दिला. गेवराई, बीड, मांजरसुंबा येथे लाखो समाजबांधवांनी जरांगे पाटील यांचे अभूतपूर्व स्वागत केले. जरांगे पाटील यांना साधारण 135 किलोमिटर अंतर वाहनाने पास करण्यासाठी 15 ते 7 तास कालावधी लागला. 


पाटोदा मुक्कामी आल्यानंतर प्रकृती खालवली असताना जरांगे पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केले. पक्ष, राजकारण बाजूला सारून एक व्हा, कोणी कोणाचं नाही स्वत:च्या लेकराबाळांसाठी एकत्र या. मी माझ्या पत्नीला सांगून आलो आहे. शक्यतो मला काही होणार नाही. काही झालंच तर भिक मागून खा, शिल्लक राहिलेली दोन एक्कर जमिन विकून मुलींचे लग्न कर, मात्र स्वाभिमान ढळू देऊ नको. असं म्हणत जरांगे पाटीलयांनी माझ्यासोबत कोणीही मुंबईच्या दिशेने येणार नाही अशा सक्त सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. 



पहाटे अचानाक जरांगे पाटील यांची प्रकृती खालवल्याने त्यांना त्रास होवू लागला. मात्र, मागण्यांवर ठाम जरांगे पाटील यांनी उपचारास नकार दिल्याने डॉक्टरांच्या टीमचाही नाविलाज झाला. शेवटी समाजाच्या आग्रहाखातर नारायणगडाचे मठधिपती महंत शिवाजी बाबा महाराज यांनी पाटोदा येथे जरांगे पाटलांची भेट घेवून उपचाराचा आग्रह केला. पुढील मार्गक्रम स्थगित करून जरांगे पाटील यांनी पाटोद्यातच उपचार घेतले. दरम्यान, नियोजित मुक्काम रद्द करून ठरलेल्या मार्गानेच जरांगे पाटील मुंबईकडे निघणार असल्याची माहिती सांगण्यात येत आहे
Previous Post Next Post