जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व रँली. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.) परभणी ‘संवाद’ रॅलीस लाखोंचा जनसमुदाय.परभणी : दि.07 मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली रविवारी (दि.07 जून)दूपारी परभणीत सकल मराठा समाजाच्या वतीने अभूतपूर्व अशी संवाद व शांतता रॅली काढण्यात आली,या रॅलीत हजारो महिलां सह लाखो समाज बांधव सहभागी झाले होते .जरांगे पाटील यांचे दुपारी एकच्या सुमारास जिल्ह्याच्या सीमेवर म्हणजे झिरो फाट्यावर आगमन झाले; तेव्हा सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. फटाक्यांच्या आतिष बाजीने, प्रचंड घोषणांनी झिरोफाटा अक्षरशः दणाणला.तिथून शेकडो गाड्यां च्या ताफ्यासह रॅलीने परभणी कडे कुच केली. परभणी ते वसमत या मार्गावर ठिकठिकाणी या रॅलीचे खेड्यापाड्यातील ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले. वसमत रस्त्याने दोनच्या सुमारास रॅली परभणीत दाखल झाली, कै.वसंतराव नाईक यांच्या पुतळ्या स पुष्पहार अर्पण करून, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याकडे रँलीने कुच केली.त्या ठिकाणी जरांगे पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन केले. तेथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास व त्या ठिकाणी उपस्थित हजारोच्या जनसमुदायासही अभिवादन करीत जरांगे पाटील यांनी नूतन विद्यालयाच्या मैदानाकडे प्रस्थान केले.दरम्यान बस स्थानक मार्गे प्रस्थान करते वेळी जरांगे पाटील यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्याही पूर्ण कृती पुतळ्यास अभिवादन केले. तेथून जरांगे पाटील यांचा मोठा ताफा जिंतूर रस्त्यावरील नूतन विद्यालयाच्या मैदाना वर दाखल झाला. त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित सकल मराठा समाजाच्या बांधवांनी एकच जल्लोष केला; "एक मराठा लाख मराठा' "मराठा समाजास आरक्षण मिळालेच पाहिजे' या व "छत्रपती शिवाजी महाराज कि जय' "जय भवानी जय शिवाजी' या घोषणांनी संपूर्ण रँलीस्थळ अक्षरशः दणाणून गेले.त्या ठिकाणी जरांगे पाटील यांनी लाखो जनसमुदायाचे स्वागत स्वीकारित, त्यांचे अभिवादन करीत रॅलीस सुरुवात केली.जिंतूर रस्त्यावरील चौकातून र्ँलीस प्रारंभ झाला. तेथून ही रॅली जेल कॉर्नर, महाराणा प्रताप चौक, पोलिस पेट्रोल पंप, नानलपेठ कॉर्नर, छत्रपती शिवाजी रोड मार्गे छत्रपती शिवाजी चौक, गांधी पार्क, नारायण चाळ, विसावा कॉर्नर मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात सायंकाळी उशिरा रॅली दाखल झाली.

Previous Post Next Post