परभणी जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. )परभणी : ता.10शहरासह जिल्हयात बुधवारी सकाळी सात वाजून 14 मिनिटांच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला.हिंगोली व नांदेड या दोन जिल्ह्यात याच क्षणाला भूकंपाचा धक्का बसला. त्याप्रमाणेच परभणी शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी सात वाजून 14 किंवा 15 मिनिटांच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसला.झरी, बोरी, जिंतूर, वालूर,सेलू या भागात हे धक्के जाणवले. अशी माहिती हाती आली आहे. काही नागरिकां ना भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला;काहींना धक्क्या ची जाणीव झाली नाही.

Previous Post Next Post