लोणखेडा येथे शहादा मंडल कार्यकर्त्यांची संवाद बैठक संपन्न..... (नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी) : तालुका भारतीय जनता पक्षाच्या मंडल कार्यकर्त्यांची राज्य अर्थसंकल्प मांडणी, राष्ट्रपती अभिभाषण व कार्यकर्ता संवाद या विषयावर बैठक गुरुवारी संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उपाध्यक्ष तथा शहादा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रा.मकरंद पाटील होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार प्रदेश कार्यकारिणी सदस्य दीपकभाई पाटील, महामंत्री विजय चौधरी व जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवार दि. 11 जुलै रोजी लोणखेडा ता. शहादा येथील महात्मा गांधी सभागृहात मंडल बैठक घेण्यात आली. या बैठकीत महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प मांडणी, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील वाचन व कार्यकर्ता संवाद आयोजित करण्यात आला होता. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उपाध्यक्ष प्रा.मकरंद पाटील होते. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विनोद जैन, सौ.कल्पना पंड्या, तालुका अध्यक्ष नितीन पाटील, सौ.अनामिका चौधरी, काशिनाथ सोनार, शिवाजीराव मोरे, नजमोद्दीन खाटीक, दंगल सोनवणे, सौ.ज्योती पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रा.मकरंद पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात सर्व घटकांना सामावून घेतले आहे. सबका साथ सबका विकास या सूत्रानुसार राज्याचा विकास हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्यासह देश पातळीवर भारतीय जनता पक्षाची ध्येयधोरणे राबविण्यासाठी आपण सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीत मंडळातील विविध मोर्चा व प्रकोष्ट पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. डाॅ.विजयप्रकाश शर्मा यांनी अर्थसंकल्पातील समाविष्ट करण्यात आलेल्या तसेच राष्ट्रपती अभिभाषणावरील मुद्द्यांवर सविस्तर माहिती दिली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी पदाधिकारींनी संवाद साधून म्हणणे जाणून घेतले. शहादा ग्रामीण मंडळाध्यक्ष नितीन पाटील यांनी आभार व्यक्त केले.

Previous Post Next Post