प्राध्यापक रामचंद्र भरांडे साहेबांचा उपोषण अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सकल मातंग समाज उतरला रस्त्यावर....... (मारोती एडकेवार सगरोळी प्रतिनिधी सगरोळी : सकल मातंग समाजाकडून अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष माननीय रामचंद्रजी भरांडे साहेब यांनी एक जुलैपासून मातंग समाजातील अ ब कड वर्गीकरणाची मागणीसाठी व मातंग समाजातील लहुजी साळवे अभ्यास आयोगाची अंमलबजावणी करणे दादासाहेब गायकवाड यांच्या सबलीकरणाची किती लाभधारकांना लाभ झाला आहे याची चौकशी करणे बाबत मातंग समाजाच्या शमशानभूमीचे पूर्ण काम लवकरात लवकर होण्याबाबत तसेच अनेक मातंग समाजाच्या योजनेबद्दल सरकार धीर देत नसून त्याबद्दल प्राध्यापक रामचंद्र भरांडे साहेब यांनी एक जुलैपासून आमरण उपोषणा बसलेले आहेत तरी त्यांची दखल शासन घेत नसल्यामुळे सकल मातंग समाजाच्या वतीने बिलोली धर्माबाद देगलूर नायगाव या अनेक ठिकाणी हा मोर्चा आणि रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे तरी शासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर मातंग समाजाच्या मागणीची व प्रश्नांची अंमलबजावणी करून आबाकडे वर्गीकरण लवकरात लवकर करावे अशी विनंती सकल मातंग समाज करत आहे तरी आज दहा दिवस झाले तरी रामचंद्र भरांडे साहेबांच्या उपोषणेन सुटत नाही त्यांचे प्रकृती खालावत जात आहे तरी त्यांच्या जीवाला जर काही धोका झाला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल असे मातंग समाजाची विनंती आहे तरी सगरोळी व बिलोली तालुक्यातील तमाम लोकस्वराज आंदोलन संघटनेचे कार्यकर्ते व सकल मातंग समाज यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना विनंती करण्यात येते की आपण रामचंद्र भरांडे साहेबांची मागणीला विनंती देऊन लवकरात लवकर मागणी पूर्ण करावे आणि उपोषण संपवावे अशी विनंती मातंग समाजातील सकल मातंग समाज व लोकस्वराज्य आंदोलन संघटनेचे कार्यकर्ते करत आहेत
byMEDIA POLICE TIME
-
0